पँथर प्रकाश पगारे यांना भावपुर्ण आदरांजली

( राहुल हंडोरे यांजकडून )
पँथर प्रकाश पगारे यांना भावपुर्ण आदरांजली
नेरळ दि. 1 जानेवारी 24
पँथर प्रकाश पगारे यांच्या आकस्मित निधनाने समाजाची तसेच कामगार चळवळीची हानी झाली आहे असे उदगार रेल्वेच्या एन आर एम यू युनियनचे अध्यक्ष वेणूगोपाल नायर यांनी नेरळ येथे कालकथित प्रकाश पगारे यांच्या श्रद्धांजली सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना काढले. अध्यक्षस्थानी संतोष सदावर्ते होते.
नेरळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व्हावा हा प्रकाश पगारे यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे एन आर एम यू युनियन तर्फे एक लाख रुपयाची देणगी वेणूगोपाल नायर यांनी जाहीर केली
रेल्वे कामगार बँकेचे चीफ मॅनेजर डी. एस. सावंत म्हणाले की, प्रकाश पगारे हे जहाल आंबेडकरी नेते, आणि कृतिशील विचारवंत लेखक होते. त्यांनी लिहिलेले स्वचरित्र / आत्मचरित्र प्रकाशित करणे हेच त्यांना खरी आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल. रेल्वे चिप कंट्रोलर, अधिकारी सुधाकर सरवदे म्हणाले की, समाजातील एक एक आधारस्तंभ काळाच्या पडद्या आड जात आहेत तेव्हा कार्यकर्यांनी स्वतःच्या प्रकृतीला जपले पाहिजे
रिपब्लिकन नेते आण्णासाहेब रोकडे यांनी पँथर प्रकाश पगारे यांच्या समाजसेवेचे अनुभव कथन केले. प्रकाश पगारे यांचे सहकारी राहुल हंडोरे म्हणाले की, प्रकाश पगारे यांचा नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग होता. औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठ गेटवरील स्मारक पाटीवर ना. रामदास आठवले यांच्या नावाखाली प्रकाश पगारे यांचे नांव आहे. प्रकाश पगारे हे पँथरच्या सुरवातीचा काळात आपल्याला आर्थिक मदत करत होते अशी कबुली ना. रामदास आठवले यांनी कल्याण येथील कार्यक्रमात केली होती. प्रकाश पगारे यांचे धाकटे बंधू कालकथित गणेश पगारे यांचा तळेगावच्या धम्म भूमिला जागा मिळवून देण्यात सक्रिय सहभाग होता अशी आठवण राहुल हंडोरे यांनी या प्रसंगी करून दिली .रायगड भूषण लक्ष्मण अभंगे यांनी जयभीम आणि बाप म्हणजे काय यावर विश्लेषण केले. ठाणे महापालिका नगरसेविका विमलताई भोईर, हृदयरोग तज्ञ् डॉ विकास कांबळे, रिपब्लिकन नगरसेवक भीमराव डोळस, समाजसेवक के. बी. ब्राह्मणे, सिद्धार्थ सदावर्ते, सूर्यकांत भोईर, बबन मोरे, सुनील गायकवाड, आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
कार्यक्रमाला भीमा कोरेगाव आयोगाचे वकील ऍंड. बी जी. बनसोडे, प्रा. डॉ. अरुण अहिरराव, पत्रकार कुसुम चंद्रमोरे, आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज फत्तेसिंग राजे भोसले यांनी शोकसंदेश पाठविला होता.
प्रारंभी बौद्धचार्य गोपाळ जाधव यांनी बुद्धवंदना घेतली. तर शेवटी भन्ते अनोमदास्सी यांनी सरणाथे घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. प्रास्तविक तुळजापूरचे बौद्धमहासभेचे अध्यक्ष देविदास कदम यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला नेरळ येथील सम्राट तरुण मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
पँथर प्रकाश पगारे हे गेल्याचे वाचून प्रथम धक्का बसला.
प्रकाश पगारे हे लढाऊ कामगार नेते आणि आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू वृत्तीचे निर्भिड नेते होते, त्यांच्या कामाचा आणि काम करण्याच्या पद्धतीचा पँथर जागोजागी दिसत होता. त्यांनी मला नेरळ ला येण्यासाठी खूप वेळा आग्रह केला होता.मी
प्रत्येक वेळी मुंबई बाहेर असल्यामुळे भेटू शकलो नाही. यांची खंत वाटते,ते ज्या कामगार ट्रेड युनियन मध्ये काम करीत होते,ते आणि बाबासाहेबांची स्वतंत्र मजदुर युनियन याबाबत अधिक चर्चा करण्याची इच्छा होती, त्यासंबंधी पुस्तक मी त्यांना दिले होते. शेवटी ती आठवण आता कायम आठवण देत राहील प्रिय मित्र कलकथीत प्रकाश पगारे यांना माझ्या कुटुंबाकडून v स्वतंत्र मजदुर युनियन कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
Thank you sir