मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

राष्ट्रीय महामार्गाच्या गलिच्छ कारभारा मुळे टॅकर ने दोन शाळकरी मुलींना चिरडले

गावकऱ्यानी केला रास्तारोको आंदोलन


 उमेश सुरवसे
धाराशिव दि.१५(प्रतिनिधी)-
उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे भरधाव वेगातील टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले.यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरे गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली.श्रेया पात्रे असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोलापूर हैदराबाद – महामार्गा रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक तुंबली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. अपघात घडताच संतप्त नागरिकांनी टँकर चालकास अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.कॅप्टन जोशी विद्यालयातील दोन विद्यार्थिनी श्रेया सुरेश पात्रे (इयत्ता सातवी) व श्रद्धा श्रीकांत कांबळे (इयत्ता सहावी) या बुधवारी पावणे दहाच्या सुमारास सकाळी रस्त्याच्या कडेने शाळेला जात होत्या. तेव्हा जनावर बाजार मैदाना समोरून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टँकर नंबर MH43BG.2173 या टॅंकरने चिरडल्याने श्रेया पात्रे हीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी श्रद्धा कांबळे ही गंभीर जखमी झाली आहे.

अपघात होताच ग्रामस्थांनी जखमी मुलीस उमरगा येथे उपचारासाठी पाठवले, पण ती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथे पाठवण्यात आले. मृत मुलीस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान या टॅंकरने एका सायकलवाल्यास चिरडले असते.तो बालबाल बचावला तर सायकलीचा चक्काचूर झाला आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांचा हंबरडा फोडला होता.

येणेगूर येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ आणि दोन्ही बाजूचा मार्ग प्रशासनाच्या निषेध करीत आम्हाला न्याय पाहिजे असे म्हणत जिल्हाधिकारी व संबंधित मक्तेदार आल्याशिवाय असा पवित्रा घेत.केवळ मक्तेदाराच्या हलगर्जीमुळे महामार्गावर आणखी किती बळी घेणार असा जाब विचारला आहे यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने लांबचा लांब रांगा लागल्या.सोलापूर हैदराबाद महामार्गाचे काम येणेगुर परिसरात अनेक महिन्यापासून रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहे हे काम लवकर पूर्ण करावे. अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष सुरु आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!