निरंकुश बेबंद ब्राम्हणी फॅसिझम आणि कोंडीत सापडलेले आंबेडकरी राजकारण…

रविवार , 31 डिसेंबर 2023.
डॉ.संजय दाभाडे , पुणे.
9823529505
आंबेडकरी विचार व चळवळी मुळे ब्राम्हणी राजकारण प्रदीर्घ काळ कोंडीत सापडले होते. पुढे हळू हळू ब्राम्हणी राजकारणाने त्या अपराधीपणातून स्वतःची सुटका करून घेतली. ब्राम्हणी राजकारणाने पद्धताशिरपणे डॉ.आंबेडकरांचे विचार नाकारत डॉ.आंबेडकरांना मात्र प्रतीक म्हणून सामावून घेतले.
मंडल मधून धडा घेत बहुजन अस्मिता ना गोंजारत दुर्लक्षित जात समूहाच्या कडे लक्ष देत त्यांना प्रतिनिधीत्व मध्ये सामावून घेतले.
लागोपाठ मुस्लिम , दलित नी आदिवासी राष्ट्रपती देखील दिले …..!
आता घडले उलटे आहे. आता ब्राम्हणी राजकारण सुसाट सुटले आहे नी आंबेडकरी चळवळ मात्र कोंडीत सापडली आहे…..!
बहुजनांना हिंदुत्वाच्या धाग्यात जोडण्याची कला त्यांनी अवगत केली. हा सावरकरवादाचा व्यवहारातील विजय म्हणता येईल. पुढील काळात तर मी – मी म्हणणारे आंबेडकरवादी देखील गळाला लावले. मायावती असो की पासवान , उदित राज असो की आठवले ….यांना ते जोडत गेले. हे तथा कथित आंबेडकरी नेते व कार्यकर्ते आता थेट संघाच्या शाखेवर जातील अशी स्थिती आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुध्दा ते जाऊ लागले असल्याचे कळते आहे…..संघाच्या नागपूर मधील बौद्धिक ना ते कधी हजेरी लावतील याची तेवढी प्रतीक्षा आहे.
आज स्पष्टपणे असे घडले आहे की ब्राम्हणी राजकारणाच्या हातात एक हाती व सर्वंकश सत्ता आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्याला सर्वात मोठी आपत्ती म्हणत होते तो ब्राम्हणी फॅसिझम सत्तेत आला आहे.
ह्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी राजकारण ह्यातून कसा मार्ग काढते हे मोठं आव्हान आहे.
डॉ.संजय दाभाडे ,
पुणे ,
9823529505
sanjayaadim@gmail.com
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत