महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

भिमाकोरेगाव येथे १ जानेवारी रोजीचे कार्यक्रम आणि व्यवस्थापन…

भिमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा याहीवर्षी १ जानेवारीला मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. यासाठी प्रशासनानेही पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
असे असेल नियोजन ?
३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विजयस्तंभ अभिवादनासाठी सर्व सजावटीसह संपूर्णपणे खुला राहणार असून भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीसह अन्य आंबेडकरी पक्ष संघटनांचे विविध कार्यक्रम सुरु होणार आहेत.
विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे उद्घाटन याच दिवशी होणार असून ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ वाजता फटक्यांची भव्य आताशबाजी करण्यात येणार आहे.
हे नेते असतील उपस्थित
१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार हे विजयस्तंभास मानवंदन देणार आहेत.
यावेळी भिमाकोरेगाव शौर्यदिनासाठी कार्यरत राहिलेले पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा स्मृती चिन्ह व मानपत्र देऊन अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहेत.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, भिमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, भारतीय बौध्द महासभेचे भिमराव आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, भारतीय दलित कोब्राचे अॅड. भाई विवेक चव्हाण यांचेसह माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी इत्यादी मान्यवर अभिवादन करणार आहेत.
१ जानेवारी रोजीचे कार्यक्रम
सकाळी ८:३० वाजता समता सैनिक दलाची मानवंदना परेड अत्यंत दिमागदार पध्दतीने बॅन्डपथकासह संचलन करणार असून यात सुमारे ८०० पेक्षा अधिक समता सैनिक सहभागी होणार आहेत.


सकाळी ९:३० वाजता भारतीय सैन्य दलातील महार रेजिरमेंटमधील निवृत्त १५०० सैनिकांची मानवंदना परेड आयोजित करण्यात आली असून त्यांचे वतीने पुष्पचक्र अर्पण करुन लष्करी इतमातील महार बटालियन गान गायले जाणार आहे. यासाठी देशभरातील विविध भागातून निवृत्त सैनिक यात सहभाग होणार आहेत.


सकाळी १०:३० नंतर आंबेडकरी कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली ढोल पथक तसेच ढोल लेझिम पथक हे देखील या सोहळयात सहभागी होणार आहेत.


अभिवादन सोहळयानिमित्त भारतीय दलित कोब्राचे भाई विवेक चव्हाण, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांचेसह पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या अभिवादन सभा परिसरात होणार आहेत.


यंदाच्या वर्षी आंबेडकरी साहित्य तसेच पुस्तक विक्रेत्यांना विजयस्तंभालगतच जागा उपलब्ध करुन दिली असल्यामुळे पुस्तक विक्रेत्याबरोबरच अनुयायांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासकीय तयारी
पीएमपीकडून दि. ३१ डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी सुमारे १ हजार ५० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ डिसेंबरला ४७५ बस दोन शिफ्टमध्ये चालवल्या जातील. एक जानेवारीला ५७५ बस दोन्ही बाजूने चालविण्यात येणार आहेत. गाड्यांसाठी शिक्रापूर येथे पार्किंगच्या ठिकाणी ३१ डिसेंबरला
तेराशे वाहक तर एक जानेवारीला सुमारे दीड हजार वाहक, चालक तैनात असतील.

पेरणे येथे पार्किंगला ३१ डिसेंबरला ११०० तसेच एक जानेवारीला १३०० वाहक – चालक दोन शिफ्टमध्ये काम करतील. एनडीआरएफचे एक पथकही नेमले आहे. जिल्हा व शहर पोलिसांचे आठ हजार कर्मचारी व अधिकारी जबाबदारी सांभाळणार आहेत.

अनुयायी मोठ्या प्रमाणावर येणार असल्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूला ११० एकरांवर ३४ वाहनतळ उभारले जाणार आहेत. गेल्यावर्षी सुमारे १६ लाख अनुयायी आले होते. त्यानुसार ६० एकरांवर १७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली होती.

या ठिकाणी सुमारे दोन हजार शौचालये उभारण्यात आले असून सक्शन मशिन ठेवण्यात
येणार आहेत.

वैद्यकीय विभागाचे सुमारे २५९ अधिकारी व कर्मचारी दोन्ही दिवशी वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या २० तर अन्य ३० अशा एकूण ५० रुग्णवाहिका या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.

सुमारे २० हजार शासकीय निमशासकीय कर्मचारी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र प्रयत्न करत असल्यमुळे हा उत्सव अत्यंत आनंदात पार पडणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!