Low cost housing चे निर्माते – मजूरमंत्री डॉ. भीमराव आंबेडकर.

मजूरमंत्री असताना बाबासाहेबांनी धनबादच्या अत्यंत धोकादायक अशा खाणींना भेट दिली होती, तिथे गेल्यानंतर 400 feet खोल खाणीत कामगारांची काय अवस्था असते हे पाहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा तिथल्या इंजिनियर्सनी सांगितले की, खाणी खूप धोकादायक आहेत आणि कधीही त्या ढासळतात म्हणून खोल खाणीत तुम्हाला जाता येणार नाही. परंतु डॉ बाबासाहेबांनी हट्ट केला आणि ते विजेरी टोपी घालून 400 feet खोल खाणीत, जीवाची पर्वा न करता केवळ कामगारांची अवस्था बघण्यासाठी बाबासाहेब उतरले. ते जेव्हा वर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कामगारांची अवस्था पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले.
कामगारांची वस्ती अत्यंत दुर्दशेत होती. कामगारांसाठी त्या वेळेला धनबादला low cost housing ची कल्पना डाॕ.बाबासाहेबानी मांडली आणि ती कार्यान्वयीत केली. भारतात पहिल्यांदा low cost housing ची कल्पना राबविली गेली आणि ती बाबासाहेबानी राबवली. कामगारांना चांगली घरं पहिल्यांदा देण्यात आली.
स्वतंत्र मजूर पक्ष हा फक्त कामगारांसाठी कार्यरत असलेला भारतातला पहिला कामगार पक्ष, ज्याचे संस्थापक होते डॉ बाबासाहेब आंबेडकर.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत