
काल श्रीलंकेनं आय सी सी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत, लखनौ इथल्या अटलबिहारी वाजपेयी मैदानावर नेदरलँडसचा पाच गडी राखून पराभव केला. सर्वाधिक 91 सदीरा समरविक्रमानं तर 54 धावा पथुम निसांकानं केल्या. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या नेदरलँडसचा डाव 49 षटकं आणि 4 चेंडूत सर्वबाद 262 धावांवर आटोपला.
अन्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा 229 धावांनी पराभव केला. विजयासाठी 400 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ 22 षटकांमध्ये केवळ 170 धावा करु शकला. दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासन यानं 109 तर रिझा हेंड्रीक्स यानं 85 धावा केल्या. भारताचा पुढचा सामना आज धरमशाला इथं न्यूझीलंडविरुद्ध दुपारी दोन वाजेपासून होणार आहे. दोन्ही संघ या स्पर्धेत आतापर्यंत अजेय आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत