दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत-महात्मा ज्योतीबा फुले

प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे

स.गा.म. कॉलेज, कराड मोबा. ९४२०६२७३४५

शैक्षणिक क्रांतीचे पहिले अग्रदूत म्हणून महात्मा फुलेंचे नाव समोर यते. ११एप्रिल १८२७ रोजी पुणे या ठिकाणी जन्मलेले ज्योतिबा फुले महाराष्ट्रातील पहिलेच ‘महात्मा’ ठरलेले आहेत. शिक्षणाचा पाया घालण्याचे महान कार्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी केलेले आपणास दिसून येते. सातारा पासून ४० कि. मी. अंतरावरती असणारे कटगुण हे फुले घराण्याचे गाव आहे. त्या कुटुंबाचे आडनाव गोरे होते. पण पुढे हे फुले झाले. त्यांचे पणजोबा गोरे. ते कटगुण गावात गावच्या पाटील आणि कुलकर्णी यांच्या सोबत त्यांच्या हाताखाली गावकारभारात चौगुला करायला मदत करत. म्हणजे शेतसारा वसूली, हंगामात पिकावर लक्ष ठेवणे हा शिवकालीन एक मान, पदवी च म्हणावी लागेल ती बारा बलुतेदाराकडील कोणाकडे तरी असायची. एकदा काहीतरी कारण घडले आणि कुलकर्णी यांच्याशी त्यांचे भांडण झाले त्यांची छळवणूक होऊ लागल्याने त्यांनी गाव सोडले व पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी नावाच्या गावात राहू लागले. पुढे त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव शेटीबा होय हे ज्योतीबांचे आजोबा त्यांना तीन मुले राणोजी, कृष्णा आणि गोविंदा ज्योतीबा हा गोविंदराव यांचा मुलगा.

खानवडीत कामे नसल्याने उदरनिर्वाहासाठी पुढे हे सर्वजण पुणे शहरात आले मिळेल ते काम करता करता एका सावकाराकडे शेळ्या राखण्याचे काम करू लागले नंतर त्या सावकारांने गोरे कुटुंबाला आपल्या फुलांच्या धंद्याच्या कामावर घेतले. फुलांच्या धंद्याचे काम करता करता त्यातील चांगली माहिती झाल्यावर या कुटुंबाने स्वतंत्र फुलांचा धंदा सुरू केला. सर्व वस्तू बनवत असल्याने त्यांच्या व्यवसायाची माहिती पेशवें च्या कानावर पोहचली तिकडून मालाची मागणी सुरू झाली. त्यामुळे पुढे फुले आलेत फुले आलेत म्हणता म्हणता हळू हळू हे कुटुंब फुले नावाने प्रसिद्ध झाले. तेच आडनाव रूढ झाले. जेव्हा पेशवे व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. पेशवेंची सत्ता गेली, काम ही गेले व चुलते राणोजी नी सर्व कारभार आपल्या हातात घेतला. त्यामुळे कृष्णा व गोविंदा यांनी स्वतंत्र भाजी विक्रीचा धंदा करून कुटुंब चालवू लागले. धंदा जोमात आल्याबर धनकवडी मधील झगडेपाटील यांच्या चिमनाबाई नावाच्या मुलीशी गोविंद चा विवाह झाला. झगडेपाटील यांची आर्थिक परिस्थिती चांगलीहोती. पण तरी ही चिमणाबाई फुले कुटुंबात रमून गेल्या. एके दिवशी शनिबार बाडा जळला व दुसर्याच दिवशी चिमनाबाईंच्या घरी बाळाने जन्म घेतला. ज्या बाळाला जन्म दिला ते हे रत्न ज्योती. की या ज्योतीने जो समाज अंधश्रद्धा जुन्या चालीरीती, जळमटलेल्या पंरपरा जाळून टाकत गेली नवीन वैज्ञानिक दृष्टि देत गेली. शेतकऱ्यांना गुलामगिरीच्या पाशातून मुक्त करत राहिली, सामाजिक क्रांती, धार्मिक क्रांती, सत्यशोधक व मुला- मुलींच्या शैक्षणिक क्रांतीसाठी १८९० पर्यंत तेबत राहिली. २८, नोव्हेंबर १८९० ला त्यांची प्राणज्योत मालवली. बहुजन वर्गाला आपल्या नावाप्रमाणे, आपल्या सुबुद्धी ने प्रकाश देऊन जागृत ठेऊन गेलेली

आहे. आईचे प्रेम ज्योतिबांना एक वर्षभर लाभले. मातृप्रेमापासून ते बंचित झाले. मुलांना राजाराम च ज्योतिबा यांना सावत्रपणाचा त्रास होऊ नये म्हणून गोविंदा ने दुसरा विवाह करणे अयोग्य मानले. त्यांनी दूरच्या आपल्या नात्यातील मानलेली बहिन सगुणाबाई यांना आणले मुले मोठी होत होती सगुणाबाई पुढे जॉन नावाच्या इंग्रज मिशनर्याकडे मुले सांभाळण्याचे काम करत असतांना लहान ज्योतीबा ला घेऊन जात. तेथे या ज्योतिबा ने इंग्रज मुलांच्या बरोबर खेळत खेळत इंग्रजी धडे घेतले ऐकले, शिकले, जातिभेद विरहीत जीवन अनुभवले. हेच संस्कार ही पुढे त्यांच्यात रूजत गेले. जे प्रत्यक्ष त्यांनी आपल्या जीवनात उत्तरवून एक आदर्श घडविण्याचा, माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर जगत राहिले. बालपणापासून ज्योतिबा व्यायाम करायचे. उत्कृष्ट व्यायाम पड्डू लहुजीबुवा मांग यांच्या तालमीत सर्व प्रकारचे व्यायाम करून सर्वच बाबतीत सदृढ होत गेले. शिक्षण काळात अनेक जातिधर्मातील मुले त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मानवता ही एकच जात त्यांनी अवलंबली. सर्व जातीधर्माचे त्यांचे मित्र होते. पुण्यात येणारे कबीर पंथी यांना ज्योतिबांनी जवळून ऐकले, व तसाच जगण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयोग ही करत राहिले. हिंदू मुस्लिम समाजातील चांगल्या विचारांचे

ते पाईक झाले. कचीरांच्या ‘बीजक’ या

अरे इन दोहन को राह न पायी हिंदुओं की हिंदुवाई देखी तुर्कन की तुर्कवाई।

पानी केरा बुदबुदा

अस मानस की जात। एक दिन छिप जाएगा, ज्यों तारा परभात ।।

दोन्हीं धर्मांना त्यांनी फटकारले. फुलेंनी दोघामधील, धार्मिक कर्मकांड, कालबाह्य

धर्मकल्पना, रूढी, परंपरा ते नाकारत राहिले. त्यांनी स्कॉटीश शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करतांना थॉमस पेन यांच्या ‘राईट्स ऑफ मैन ‘या ग्रंथाचा ही त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला तो ग्रंथ म्हणजे

मानवी हक्क आणि मानवी कर्तव्याची जाणीव करून देणारा होता. त्याचप्रमाणे त्यांनी मुस्लिमांच्या ‘कुराण’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ जॉर्ज वॉशिंग्टन, यांच्याही चरित्रांचा चांगलाच अभ्यास केला असल्यामुळे त्यांचा पिंड चांगलाच घडलेला होता.

एकदा ज्योतीबा आपला ब्राह्मण मित्र सखाराम परांजपे याच्या लग्नाच्या बरातीतून चालले होते. पण त्याला पाहून काही जुन्या परंपरेच्या कर्मठ लोकांना हे आवडले नाही. ते म्हणाले अरे, तू आम्हा ब्राह्मणांच्या बरोबरी ने भर रस्त्यातून चालतोस? तूशूद्र आहेस विसरलास की काय? इद्धद्धधर्मान घालून दिलेली मर्यादा ओलांडून तू अधर्म

करतो आहेस! असं बागून तू आमचा अपमान करून काय साधतो आहेस. ‘चल आमच्यापासून दूर हो सगळ्यांच्या मागून चालत ये फार तर.

असा मार ही त्यांच्या वर्मी लागला. आपले काही चुकत नाही. मी ही एक माणूसच आहे असे त्यांना वाटत होते. यातूनच सामाजिक क्रांती चे बीज त्यांच्यात रूजले. समानता, स्वातंत्र्य, मानवी हक्क, होत असणारा अन्याय, यासाठी लढत रहायचे असे त्यांनी ठरविले. यासाठी शिक्षण हे सर्वांना मिळाले पाहिजे तरच वैचारिक परिवर्तन घडविता येऊ शकते असे त्यांना बाटू लागलेले होते व तसा त्यांनी प्रयत्न ही सुरू केला.

हे विद्रोही विचार त्यांच्या

वडिलांना आवडत नव्हते. घरात पटत नव्हते. पण ज्योतीबा थांबले नाहीत. बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे उघडे नव्हते ते उघडण्याचा प्रयत्न ज्योतीबा नी केला. १८४० मध्ये धनकवडीतील खांडोजी नेवसे पाटलांची मुलगी सावित्रीबाई शी ज्योतीबांचा परंपरेप्रमाणे बालविवाह ही झालेला होता. त्या ही शिक्षणापासून वंचितच होत्या. त्या ही पुढे एका साहेबांच्या घरी घरकामासाठी जात इंग्रज तेथे त्यांना एकदा इंग्रजी चित्रांचे पुस्तक भेट मिळाले होते. त्यातील चित्रांचे अर्थ ज्योतीबांनी तीला समजून सांगीतल्याने हळू हळू तीला ही शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली व पुढे स्वतः ज्योतीबा नी

ती पूर्ण केली.

त्यांच्या लक्षात आले ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी म्हणून ते स्त्री शिक्षण, विधवा, विवाह, या ही गोष्टी कडे वळलेले आपणास दिसतात. एकंदरीतच स्त्रियांना आणि पुरुषांना शिक्षण मिळले पाहिजे असे त्यांना बाटे. त्यांना कळले होते.

विद्येविना मती गेली, मतीविना नीति गेली.

नीतिविना गति गेली, गतिविना वित्त गेले.

वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.

त्यांनी १-१-१८४८ रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडेंच्या बाड्यात मुलींच्या साठी पहिली शाळा सुरू केली. त्यामध्ये, धनगर, मराठा, ब्राह्मण अशा समाजातील सहा मुली शिक्षण घेत

होत्या क्रमशः अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, व ज्योती कारडीले. पुढे १५ मे १८४८ रोजी ज्योतीबा नी महारवाड्यात शुद्र मुलांमुली साठी शाळा सुरू करून, शिक्षण, समाज परिवर्तनाचा पायाच घातला. शिक्षक मिळणे दुरापास्त होत होते. मग सावित्रीबाईना च प्रथम शिक्षिका बनावे लागले. झाडलोट, शिकविणे, मुलांना शिक्षणासाठी लागणार्या वस्तूपुरविण्यापर्यंत सर्व कामे या युगदाम्पत्याला करावी लागली ती करत असतांना अतिशय बाईट प्रसंगाना ज्योतीबा व सावित्रीचाई ना सामोरे जावे लागले पण ते पाठीमागे न पाहता पुढेच चालत राहिले. म्हणूनच ते शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जातात. ते पहिले शिक्षक, धर्म, समाज क्रांतिकारक, ही ठरलेले आहेत. मानवी जीवनांशी संबंधित अनेक लढ्यावर ते लढलेले आपणास दिसून येते. जवळ जवळ १८४८ पासून अखेरच्या श्वासा पर्यंत अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या स्त्री शिक्षण, अनाथ महिलांच्या शिक्षणाची सोय, रात्रीच्या शाळा, दिवसाच्या शाळा असा शिक्षणाचा प्रचार प्रसार करत राहिले. महात्मा फुले केवळ शिक्षक नव्हते एक चांगले व्यवस्थापक व बांगले लेखक ही होते. तृतीय रत्न नाटक, जातीभेद विवेक सार, चाह्मणाच कसब, विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी, छत्रपती शिवाजीराजे भोसले पोवाडा, हंटर शिक्षण आयोगापुढील निवेदन सत्यशोधक समाजोक्त, मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी, अस्पृश्यांची कैफियत सार्बजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सत्सार-१, सत्सार- २ आणि इशारा ही त्यांची पुस्तके. शिवाय अनेक निबंधाचे ही लेखन त्यांनी केलेले आहे. १८८८ रोजी त्यांना महात्मा ही पदवी जनतेने बहाल केली. सत्यशोधक समाजाची स्थापना, विधवा विवाह, अशी सामाजिक अडचणीशी निगडीत विषयाशी

संबंधित कामे करत राहिले. पण खर्या

अर्थाने ते एक सामाजिक शिक्षक म्हणून

काम करत राहिलेले आपणास दिसून

येतात.

संदर्भ ग्रंथः १) सत्यधर्मी ज्योतीबा फुले- नागनाथ कोतापल्ले

२) खरा महात्मा ज्योतीबा फुले अजित पाटील

३) महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत-दत्ता जी. कुलकर्णी

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!