आदिवासी वाड्याची उपेक्षा ; पक्क्या रस्त्याअभावी होत आहेत हाल.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही आदिवासी गाव- खेड्यापाड्यांना दळणवळणाच्या प्रमुख सुविधेपासून वंचित रहावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. पेण तालुक्यातील पावळ खोऱ्यातील आदिवासी गावपाडे आजही मुख्य रस्त्यापासून वंचित असून, येथील रहिवाशांना मुख्य बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी अडीच-तीन किमीची रोज पायपीट करावी लागत असल्याने येथील आदिवासी बांधव प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.
पेण तालुक्यातील पाबळ खोन्यातील गौळवाडी, पावटावाडी या आदिवासी ठाकूर जमतीच्या पाठ्या असून, त्यांची लोकसंख्या साधारण १००० ते १२०० पर्यंत आहे. या सर्व लोकांना रोजगारासाठी नागोठणे, पाली,पाली पेण, रोहा याठिकाणी जावे लागते. या पाड्या दुर्गम अशा डोंगराळ भागात असल्याने या वाड्यावर जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठीदेखील दररोज अडीच किलोमीटरचाप्रवास पायी करावा लागतो.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना या वाड्या अजूनही दुर्लक्षित आहेत. रस्त्याअभावी गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यास अडीच किलोमीटर डोली करून न्यावी लागते. त्यामुळे अनेक वेळा वाटेतच महिलेची प्रसूती होते. यामुळे गरोदर महिला आणि नवजात बालकाच्या जीवाला धोका निर्माण होतो. जोशीले गाडी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून मंजूर करून बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करून या रस्त्यासंदर्भात मागणी करूनदेखील प्रशासन या मागणीकडे दुर्लक्षच करीत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत