
प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू हळू इथून तेलाचे उत्पादन वाढेल. तेल आणि नैसर्गिक वायु मंडळाने बंगालच्या उपसागरातल्या आपल्या कृष्णा गोदावरी या खोल पाण्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे या तेलविहिरीतून दिवसाला ४५ हजार बॅरेल तेलाचे उत्पादन होईल अशी अपेक्षा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी म्हटले आहे. या ठिकाणाहून दिवसाला १ लाख क्युबिक मिटर नैसर्गिक वायुचेही उत्पादन होण्याची शक्यता असल्याचही त्यांनी म्हटले आहे. या मुळे देशाच्या सध्याच्या तेल आणि वायुच्या उत्पादनात ७ टक्क्यांनी वाढणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत