6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. महापरिनिर्वाण दिनी सर्वांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणे शक्य व्हावे यासाठी मुंबईत येत्या ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत