मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रारूप प्रस्तावित धोरण केले तयार

मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रारूप प्रस्तावित धोरण तयार केले असून त्यावर महिन्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उद्यानांची देखभाल महानगरपालिकेनेच करावी, तर मैदानांचा विकास आणि देखभालीसाठी सार्वजनिक खासगी तत्त्वाचा (पीपीटी मॉडेल) वापर व्हावा आणि खासगी तत्त्वावर दत्तक दिल्या गेलेल्या २६ उद्यानांसाठी वेगळा निर्णय घ्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले. या धोरणासंदर्भात निर्णय घेताना नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह चर्च करावी, असेही लोढा यांनी सांगितले.
मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने प्रारूप प्रस्तावित धोरण तयार केले असून या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्था यांच्याकडून पालिकेने १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत सूचना व हरकती मागवल्या होत्या. ही मुदत उलटून गेली तरी पालिका प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत