अवकाशातील मालमत्तेच्या सुरक्षेचे आव्हान -लष्करप्रमुख

नागपुरातील भारतीय व्यवस्थापन संस्थेतर्फे झिरो माइल संवाद संस्थेच्या सभागृहात आयोजित ‘‘इंडियन आर्मीज रोल इन सिक्युरिंग इंडियास ग्रोथ स्टोरी’’ याविषयावर पांडे बोलत होते. लष्करी सामर्थ्य’ हे राष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. कारण, राष्ट्राच्या प्रगतीसाठी जे घटक आवश्यक आहेत ते घटक सक्षमपणे, परिणामकारक ठरू शकतील, अशा हितसंबंधांचे संरक्षण लष्करी सामर्थ्यातून होत असते. वर्तमानात देशासमोरच नव्हे तर जगासमोरही काही नवीन धोके आ वासून उभे आहेत. अंतराळातील वाढत्या सशस्त्रीकरणामुळे अवकाशातील मालमत्तेच्या सुरक्षेचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे मत भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केले. ‘यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधील तांत्रिक प्रगतीचा विषय आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत