
नवी दिल्लीत राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहकांच्या समाधानावरच देशाचा विकास अवलंबून असतो, असं ते म्हणाले. सरकारने लागू केलेल्या आर्थिक आणि राजकोषीय तूट विषयक धोरणांमुळे देशात महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यात यश आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. देशातल्या ग्राहकांसाठी सुरू केलेल्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनी पोर्टल २ मुळे आता ग्राहकांच्या तक्रारींचा जास्त चांगल्या पद्धतीने आणि अधिक वेगाने निपटारा होऊ शकेल, असा विश्वास केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. राष्ट्रीय ग्राहक मदत वाहिनीवर येणाऱ्या फोनमध्ये १३ पटींनी वाढ हे ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठीच्या सरकारच्या धोरणांच्या यशाचं प्रतीक आहे, असे मतेही गोयल यांनी व्यक्त केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत