हरित अर्थव्यवस्थेसाठी कॅक्टस विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा….

ही कार्यशाळा भूमी संसाधन विभागानं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित केली आहे.या कार्यशाळेत कॅक्टस अर्थात निवडुंग लागवड आणि त्याच्या आर्थिक उपयोगांना चालना देण्यासाठी तज्ञ, उद्योजक, आणि संशोधकांना एक मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह आज पाणलोट प्रकल्पांत हरित अर्थव्यवस्थेसाठी कॅक्टस या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेला दूर दृश्यप्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतील.तसंच उद्योजक,तज्ज्ञ आणि विविधराज्य एकत्र येऊन रखरखीत,अर्ध शुष्क भागात कॅक्टस लागवडीसाठी एक पथदर्शी आराखडा तयार करणार आहेत. हरित अर्थव्यवस्थेसाठी कॅक्टस विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत