नागपूरात खासगी कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.नागपुरातल्या बाजारगाव इथल्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात ६ महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर इंडस्ट्रीज या कंपनीत कोळसा खाणींमध्ये वापरला जाणारा बुस्टर बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. दुर्घटनेतल्या मृताच्या वारसांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या वारसांना कंपनीही २० लाख रुपये देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली आणि मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. मृतांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला कंपनीनं नोकरी द्यावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत