महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

वर्षावास म्हणजे काय ?

दोन दिवसावर वर्षावास येऊन ठेपला आहे पण त्याच वेळेस आपल्या अनेक उपासक उपासिकांना वर्षावास म्हणजे नेमक काय ?

???? तथागत बुद्धांनी लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जीवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे…

???? “चरथ भिक्खवे चारिकं,बहुजन हिताय,बहुजन सुखाय,लोकानुकम्पाय,अत्थात हिताय देवमनुस्सानं ।

देसेथ भिक्खवे धम्मं,अदिकल्याणं मज्झकल्याणं,परियोसानकल्याण,सात्थ सब्यञजनं ब्रम्हचरियं पकासेथ”॥

???? ( मराठी अर्थ : भिक्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी,लोकांवर अनुकंपा करण्यासाठी,मानवांना कल्याणकारी,धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा,प्रारंभी कल्याणपद,मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा.

???? तथागत बुद्धांच्या आदेशानुसार भिक्खु संघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत,या तिन्ही ऋतुत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे,नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार – प्रसार करीत असत.,

त्याकाळी खूप पाऊस पडत असे, पावसामुळे पायी फिरणे भिक्खु संघाला अशक्य होत असे,पावसाच्या काळात भिक्खुनांज्ञ भिक्षाटनासाठी जात येत नसल्याने त्यांची ऊपासमारही होत असे,एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खु वाहून जात आणि अनेक भिक्खुंना यामध्ये जीव गमवावा लागत असे,पावसाळयात अनेक आजारांचा भिक्खु संघाला सामना करावा लागत होता,

हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत,एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्म ज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या,आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन संपन्न होऊ लागला,वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून धम्म श्रवण करीत,विहारात भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करीत,

???? इ.स. पूर्व ५२७ म्हणजे तथागत बुध्दांच्या काळापासून वर्षावास सुरू आहेत,तथागत बुध्दांनी त्यांचा पहिला वर्षावास इ.स.पूर्व ५२७ ला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इ.स.पूर्व ४८३ ला शेवटचा ४५ वा वर्षावास केला. त्यानी स्वतः श्रावस्ती, जेतवन,वैशाली,राजगृह इत्यादी विहरात वर्षावास केले, अशा प्रकारे सद्धम्माचा प्रचार तथागत बुध्दांनी करून मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले,वर्षावासाचे नाते तथागत बुध्दांच्या जीवनातील अनेक संस्मरणीय घटनांशी निगडीत आहे,

???? आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो,बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे,सर्व बौध्द उपासक उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वःताच्या घरी रोज बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “बुध्द आणि त्यांचा धम्म” या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामुहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जिवनात अनुकरण केले पाहिजे,नियमितपणे शेजारच्या बुध्द विहारात जावून धम्म श्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे,धम्मदान द्यावे,उपोसथ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सदगुणाचा पाया मजबूत करावा,आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौध्द उपासकांचा मोठा संघ तयार होईल व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुध्द भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!