मनाचे श्लोक, भगवद्गीता, मनुस्मृती हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण की धार्मिक अजेंडा?

राजेंद्र पातोडे
‘एससीईआरटी’ने जाहीर केलेला
राज्याचे शालेय अभ्यासक्रम आराखडा पूर्णपणे असैवंधनिक – राजेंद्र
पातोडे.
अकोला, दि. २४ –
नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचे नावावर भाजप आणि संघाचा धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंडा असून भारतीय ज्ञानप्रणाली या घटका नुसार मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय वादग्रस्त निर्णय घेतला गेला आहे.तसेच अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता; तर आराखड्यात मनुस्मृती समावेश करण्याचा राज्य मंडळाच्या शाळांमधील प्रस्तावित निर्णय पूर्णपणे असवैधनिक असून विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागनारा प्रस्ताव अजेंडा देशावर थोपविण्यत येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. याशिवाय मूल्ये आणि स्वभाववृत्ती या घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला गेला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे.नव्या शैक्षणिक धोरणात राज्याच्या आरखड्यात प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावावा असे सूचवण्यात आले आहे. तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती, आहार कसा होता, गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
देशावर एकधर्मिय परंपरा लादण्याचा डाव आहे.
शिक्षण हक्क कायदा विरोधातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याची शिक्षा देखील आराखड्यात देण्यात आली आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक हिंसेचा अनुभव येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात कायद्याशी विसंगत सूचना देण्यात आल्याचे दिसून येते. शालेय प्रक्रिया या घटकांत वादविवादांचे निराकरण, शिस्त यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सूचवण्यात आले आहेत.
हे राष्ट्रिय शिक्षण धोरण नसून धार्मिक तेढ निर्माण करून एकच धर्माचे तृष्टिकरण करण्याचा घाट घातला जात असून वंचित बहुजन आघाडी ह्या प्रस्तावाचा निषेध करते.सोबतच मोठ्या प्रमाणत जनतेने त्यावर आक्षेप दाखल करून सदर शिफारसी घटनाबाह्य असल्याच्या सूचना कराव्यात.तसेच राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा हा धार्मिक शिक्षण ऐवजी नवीन
जागतिक तंत्रज्ञान शिकविणारा असावा अशी मागणी देखील करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश.
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत