शिक्षणाने माणूस समृद्ध, चिकित्सक बनतो : प्रा. डॉ. जाधव

मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. संवेदनशीलता हे मूल्य मुलींनी जपले पाहिजे. शिक्षणाने माणूस समृद्ध व चिकित्सक बनतो, आधुनिक मुलींनी सावित्रीसारखे राहायला हवे. निर्भयता ही सर्वांत मोठी गोष्ट विद्यार्थिनींनी आत्मसात करावी. असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज
संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मखमलाबाद येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र व मविप्र शैक्षणिक संकुल मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी दुसरे पुष्प गुंफताना प्रा. डॉ. प्रतिभा जाधव बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद पांडुरंग पिंगळे तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संचालक रमेश पिंगळे, संचालक अॅड. संदीप गुळवे, शिक्षणाधिकारी डॉ. अशोकराव पिंगळे, होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे, माजी नगरसेवक दामोधर मानकर, मराठा हायस्कूलचे माजी उपस्थित मुख्याध्यापक अरुण पिंगळे होते.
प्रा. डॉ. प्रतिभा जाधव यांनी त्यांच्या विषयासंदर्भात आपले विचार स्पष्ट केले. तत्कालीन समाजाचे स्त्री शिक्षणाविषयी असलेले मत व स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य याविषयी विद्याथ्यांना माहिती दिली. मी देखील मविप्र संस्थेचीच विद्यार्थिनी असल्याने संस्थेप्रति आदरभाव व्यक्त केला. त्यांनी विद्यार्थ्यांना बाल सावित्रीपासून ते माय सावित्रीपर्यंतचा
प्रवास अगदी मनोरंजनात्मक पद्धतीने आपल्या शैलीतून उलगडून दाखविला. विद्यार्थ्यांसमोर जणू काही सावित्रीच उभी केली होती. समारोपात त्यांनी आईची महती सांगणारी माय हृदयस्पर्शी कवितेचे गायन केले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रतिभा जाधव यांचा परिचय विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका भाग्य शाली जाधव यांनी करून दिला. प्रास्ताविकात प्राचार्य संजय डेलें यांनी व्याख्यानमालेचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे, प्रमिला शिंदे, संतोष उशीर, प्रा. विकास थोरात यांनी केले. आभार विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक नितीन भामरे यांनी मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ सभासद पंढरीनाथ पिंगळे, परसराम पिंगळे, गोरखनाथ तिडके, भास्कर तांबे, प्राचार्य संजय डेलें, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनंदा वाघ, उपप्राचार्य राजेंद्र गाडे, ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्वला देशमुख यांच्यासह प्राध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत