पु णे – महापालिकेचा निर्णय: आता प्रत्येक महिन्याला पादचारी दिन

पु णे – महापालिकेकडून गेल्या तीन वर्षांपासून दि. ११ डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा केला जातो. यास प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अताा प्रत्येक महिन्यात एक दिवस लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ उपक्रम राबविला जाणार.
याबाबत निर्णय घेण्यासाठी वाहतूक पोलीस, व्यापारी संघटना तसेच पथारी व्यावसायिकांची पुढील आठवडयात संयुक्त बैठक घेतली जाणार. ही माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. पादचाऱ्यांबाबत जागृती तसेच नागरिकांनी वाहनांचा कमीत कमी वापर करावा, या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार असल्याचे ढाकणे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्किंग आहे. काही अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. अशा स्थितीत कोंडीचा फटका ग्राहक तसेच व्यावसायिकांनाही बसतो. त्यामुळे या भागात आल्यानंतर नागरिकांना वाहन न वापरता तसेच चालत कोणत्याही अडथळ्याविना खरेदी करता यावी, या उद्देशाने महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पादचारी दिनाच्या धर्तीवर महिन्यातून एक दिवस वॉकिंग प्लाझा केला जाणार आहे.
रविवार ची निवड करावी
यावेळी सोमवारी झालेल्या पादचारी दिनी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला. पण , हा उपक्रम रविवारी राबवावा, अशी मागणी काही पुणेकरांनी महापालिकेकडे केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत