औरंगजेबाच्या स्वप्नाचा चकनाचुर करणारी स्वराज्याची विरांगणा : महाराणी ताराराणी साहेब
भारतीय इतिहासात ज्याप्रमाणे योद्ध्यांकडून झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला उंचीवर नेऊन ठेवलेल्या कित्येक विरांगणा ही आहेत त्यापैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी भोसले होत! उत्तर, पूर्व आणि दक्षिण भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मुघल बादशहा औरंगजेबाची नजर जेंव्हा पश्चिम भारताकडे वळली, तेंव्हा त्याच्या मनसुब्यांना सुरंग लावायचे काम महाराणी ताराराणींने केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या अनेक सेनापतीकडून मार खाल्लेल्या औरंगजेबास पुन्हा आद्दल घडवून स्वराज्याच्या स्त्रीयादेखील पुरुष योद्ध्यापेक्षा कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागल्यानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले होतं. औरंगजेब मराठ्यांचे एक एक #ठाणे काबीज करीत सुटला. दरम्यान संभाजी महाराजांना यातना देऊन त्यांची हत्या करण्यात आली आणि अखंड स्वराज्य पुन्हा पोरक झाल १७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. स्वराज्याला कुणीही खंदे नेतृृत्व नाही असा विचार करुन औरंगजेबाने पुन्हा एकदा स्वराज्याचे वैभव असलेले गड-कोट काबीजकरण्यास सुरुवात केली. इतरही शत्रू टपून बसले होते. अशा बिकट प्रसंगी २५ वर्षीय महाराणी ताराराणी साहेबांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली. विखूरलेल्या सरदारांना एकत्र केल. १७०० ते १७०७ या सात वर्षात औरंगजेबाच्या सैन्याला बेजार केरुन सोडले. ही ७ वर्षे महाराणी ताराराणी साहेब सतत युद्धाला तोंड देत राहिल्या. मराठा साम्राज्याचा पुन्हा एकदा दबदबा निर्माण होऊ लागला. औरंगजेबाला मात्र चरफडतच रहावे लागले आणि १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.१७६१ त्यांच्या मृत्यू पर्यंत त्यांनी मराठा साम्राज्याचे अनेक चढउतार पाहिले. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. मराठा साम्राज्य कधीही पणास लावले नाही.
स्वराज्याच्या विरांगणेलामानाचा मुजरा!!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत