ग्रामिण भागातील डॉक्टर २३ वर्षांपासून पद्दोनात्तीच्या प्रतिक्षेतच!!

राज्याच्या आरोग्य विभागातील सावळा गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य खात्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्याकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील डॉक्टरांची प्रतीक्षा यादी अद्याप प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे या डॉक्टरांची गेल्या २३ वर्षांपासून पदोन्नती अडली आहे. शेवटच्या नागरिकांपर्यंत अविरत आरोग्यसेवा देण्याचे कार्य वैद्याकीय अधिकारी गट ‘ब’ करतात. त्यात बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, सर्पदंश, आकस्मिक सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन, प्रसूती. यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना आदींचे नियोजन हेच डॉक्टर करतात. परंतु, पदोन्नतीबाबत याच डॉक्टरांवर अन्याय होत आहे. पदोन्नतीचा लाभ न घेताही अनेक डॉक्टर सेवानिवृत्त झाले आहेत. ३०० जुने व ७०० नवीन असे सुमारे १ हजार वैद्याकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आजही आहेत. शासनाने तातडीने या डॉक्टरांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करून पदोन्नतीचा लाभ द्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा वैद्याकीय अधिकारी महासंघाने दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत