समाजमाध्यमांची वाढ कशी आहे अहिताची ? – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

‘जमनालाल बजाज फाउंडेशन’तर्फे देण्यात येणाऱ्या जमनालाल बजाज पुरस्कारांचे सरन्यायाधीशांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
समाजमाध्यमांच्या वाढीमुळे आणि समुदायांमधील वाढत्या असहिष्णुतेमुळे जगभरात ध्रुवीकरण झाले असून भारतही त्याला अपवाद नाही, असे मत देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी ४५व्या जमनालाल बजाज पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. मुक्त बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाने ही स्थिती निर्माण केल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
शाश्वत लोकशाही, संविधानाची मूल्ये तसेच मानवतावादी संस्कृतीच्या बळावर भारत ७५ वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या इतर राष्ट्रांच्या तुलनेत सरस असल्याचेही सरन्यायाधीशांनी यावेळी अधोरेखीत केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत