अंधभक्ती सोडून शिक्षणाचे दान..

शाळा बांधण्याची वडिलांची भक्तिमय इच्छा मुलाकडून पुरोगामी कृतीतून पूर्ण..
शिर्डी – अहमदनगर : साई बाबांची झोळीत त्यांचे भक्त भरभरुन दान टाकतात हे आजपर्यंत आपण ऐकले आहे. सोन्या, चांदीचे मौल्यवान दागिने तसेच रोकड नेहमीच साईबाबाला दान केली जाते. दिलीप माकम यांचे वडील पुरोगामी विचारांचे होते, शिक्षणाचे महत्त्व जाणणारे होते. म्हणून त्यांनी शिर्डी येथे शाळा बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी साई बाबाला शाळा रुपी अनोखे दान देण्यात आले आहे.
म्हणून साई संस्थानला 75 लाखाच्या इमारतीचे दान केले आहे. नवी कोरी इमारत साई संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
अशाप्रकारे दिलीप माकम यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे. दिलीप माकम यांनी शाळेसाठी साडे तीन गुंठा जागेत जवळपास 75 लाखांची इमारत साई संस्थानला दान स्वरूपात दिली आहे. साई संस्थान ला दान रुपात आलेली इमारत शिक्षणा सारख्या विधायक कामासाठी उपयोगात आणावी ही जनतेची माफक अपेक्षा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत