24 लक्ष क्विंटल धान्य खराब होण्याचा मार्गावर. – मागण्या पूर्ण होईपर्यंत भरडाई बंद

गोंदिया: महाराष्ट्रातील धान्याचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात लाखो क्विंटल धान्य सडण्याच्या मार्गावर आहे. राईस मिलर्सने केलेल्या मागण्या मध्ये 150 रुपये क्विंटलप्रमाणे भरडाई दर द्यावे, हमाली दर वाढवून द्यावे, वाहतूक दरात वाढ करावी या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संघटनेकडून असहकाराची हाक देत धान्य भरडाई करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून खरीप हंगामादरम्यान खरेदी केलेलं 24 लक्ष 77 हजार 996 क्विंटल धान्य, भरडाई न झाल्याने खराब होण्याचा मार्गावर आहे. तर रब्बी हंगामाचं धान्य खरेदी करून ठेवायचं कुठे असा प्रश्न जिल्हा पणन कार्यालयाला पडला आहे.
गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2023-24 या वर्षात जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे 1 लाख 25 हजार 129 शेतकऱ्यांनी धान्य विक्रीकरता ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी 80 हजार 806 शेतकऱ्यांनी शासकीय धान्य खरेदी केंद्रावर 24 लक्ष 77 हजार 996 क्विंटल धान्य विक्री केलं असून या धान्याचे 540 कोटी 94 लक्ष 53 हजार 76 रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.
खरेदी केलेलं हे धान्य गोदामात तसंच उघड्यावर पडून आहे. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे गोंदिया जिल्यातील 353 राईस मिलर्स पैकी 196 राईस मिलर्स ने धान्य भरडाई करण्यासाठी करार फॉर्मची उचल केली होती. त्यापैकी 33 राईस मिलर्सने धान्य भरडाईचा करार करत भरडाईला सुरवात केली नसल्याने पणन विभागाने 15 एप्रिल 2024 ला गोंदिया जिल्यातील राईस मिलर्स सोबत विडिओ कॉन्फरनसिगद्वारे मिटिंग घेत धान्य भरडाईची विनंती केली. मात्र राईस मिलर्स आपल्या मागण्यांवर अडून असल्याने आता धान्य भरडाईच्या या समस्येवर तोडगा निघालेला नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत