आरोग्यविषयकप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान

पुणे मनपा च्या होणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये गरीब जनतेसाठी फक्त 10% बेड, शासकीय 6% तर उर्वरित 84 % धनधांगड्यांसाठी..!

पुणे प्रतिनिधी : आज वारजे माळवाडी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन समारंभ पार पडला.

यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून हॉस्पिटल बद्दल सर्वसामान्यांना आनंदच आहे पण विदेशी कंपन्यांकडून वित्त पुरवठा झाल्याने सर्वसामान्यांना मुबलक दरात आरोग्य सेवा मिळतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावर बोलताना अजित पवार यांनी 375 पैकी फक्त १०% बेड मोफत राहतील व ६% बेड शासकीय साठी राहतील असे स्पष्ट केले.

देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना देशातील सार्वजनिक हॉस्पिटल ला वित्त पुरवठ्याची ही अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे सांगितले व हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात अशा पद्धतीने विदेशी तंत्रज्ञान, विदेशी वित्त व अद्यावत सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

विकासाच्या या गप्पांमध्ये सर्वसामान्य पुणेकरांना दर्जेदार व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम आरोग्य सेवा मिळावी ही पूणेकरांकडून अपेक्षा.

यावेळी पवार परिवारामध्ये सर्व काही आलबेल नाही हे सुप्रिया सुळे व अजित पवार यांच्या एकमेकांना दुर्लक्षित करण्यावरून अबोल्यावरून व बोलताना नाव न घेण्यावरून सर्वांना स्पष्ट झालं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!