दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

इतिहासाच्या दारात संविधान घेऊन उभी राहिलेली पिढी!

समाज माध्यमातून साभार

रामनवमी – अनेकांसाठी भक्तीचा, श्रद्धेचा दिवस. पण याच दिवशी या वर्षी एक ऐतिहासिक दृश्य महाराष्ट्रानं पाहिलं.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले – पण रिकाम्या हातानं नव्हे, तर हातात भारतीय संविधान घेऊन!

त्यांच्यासोबत होते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू – कॅप्टन कुणाल गायकवाड.
ही साधी भेट नव्हती, ही होती त्या ऐतिहासिक सत्याग्रहाची आठवण, ज्यामुळे 1930 मध्ये नाशिकचं काळाराम मंदिर चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं.

तेव्हा… दलितांना मंदिरप्रवेश नाकारण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड यांच्यासह हजारो दलितांनी सत्याग्रह केला.
निर्घृण हल्ले, अपमान, सामाजिक बहिष्कार सहन करूनही त्यांनी मागे पाय घेतला नाही.
पाच वर्षांच्या आंदोलनानंतर बाबासाहेबांनी ती गगनभेदी घोषणा केली –
“मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही!”

आणि आज…
त्याच मंदिरात त्यांचं संविधान हातात घेऊन हर्षवर्धन सपकाळ पोहोचतात.
संविधान पुजाऱ्याच्या हाती देतात, आणि तो क्षण काळाच्या साक्षीनं जिवंत होतो.
पुजारी म्हणतो – “आमच्या पूर्वजांनी जे अन्याय केले त्याबद्दल मी माफी मागतो.”
हर्षवर्धन सपकाळही नम्रतेनं म्हणतात – “त्या अन्यायाविरोधात आमचे पूर्वज उभे राहिले नाहीत, त्याचीही मी माफी मागतो.”

पण महत्त्वाचं वाक्य पुढे आलं हर्षवर्धन सपकाळ यांच्या कडून
“ज्यांनी दलितांना मंदिरात प्रवेश दिला नाही, त्यांचा नातू आजही त्या मंदिरात पुजारी आहे…
आणि त्या सत्याग्रहाचं नेतृत्व करणाऱ्या कर्मवीर गायकवाडांचा नातू – आकाशात भरारी घेणारा पायलट झालाय!”

इतिहासाला न्याय देणारा क्षण!

याच पार्श्वभूमीवर एक कडवट पण सत्य गोष्ट लक्षात घ्या –
त्या मंदिरातच पुजारी असलेला सुधीरदास महंत हा दुबईत फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आहे.
धार्मिक कार्याच्या नावाखाली कोण-कोणते चेहरे आजही मंदिरात वावरतात हे समजून घेणं गरजेचं आहे.

धर्माची किती मोठी विडंबना आहे लाखो लोकांचा जनप्रतिनिधी.. जानवे सोवळे नसल्याने राममंदिराच्या गर्भगृहात सपत्नीक जाऊ शकत नाही तिथे हा फसवणूक प्रकरणात अटक झालेला महंत सुधीरदास काळाराम मंदिरांच्या गर्भगृहात राजरोस मिरवतोय!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!