‘सीआयडी’ मालीकेचे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन

सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेत इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र साकारणारे दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. दिनेश फडणीस यांच्यावर मुंबईतील तुंगा रुग्णालयात १ डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. दिनेश यांची प्रकृती खालावल्याने मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या मालिकेत ‘दया’ हे पात्र साकारणाऱ्या दयानंद शेट्टीने दिनेश फडणीस यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं म्हटलं जात होतं, पण कालच दयानंद शेट्टीने हे वृत्त फेटाळलं होतं. त्यांचं लिव्हर डॅमेज असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत