ईव्हीएमचा विरोध ही लोक चळवळ व्हावी. डी एस सावंत.
आपल्या भारत देशामध्ये दर पाच वर्षांनी इलेक्शन होऊन आमदार आणि खासदार निवडून दिले जातात. पूर्वी बॅलेट पेपर वर मतदान होत होते. परंतु काही दिवसांनी ईव्हीएम नावाची मशीन इंट्रोडूस करण्यात आली. कोणतीही इलेक्ट्रॉनिक मशीन ही टेम्पर करता येते. हे वैज्ञानिक सत्य आहे. तसेच ईव्हीएम आल्यानंतर लोकांच्या अपेक्षेपेक्षा वेगळेच निकाल लागायला लागल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे ईव्हीएम च्या जागी बॅलेट पेपरने मतदान घेण्यात यावे अशी जोरदार मागणी लोकांमधून होत आहे.
प्रस्थापित राज्यकर्ते ईव्हीएमच्या विरोधात बोलायला तयार नाहीत कारण त्यांना भीती वाटते की, त्यांनी जी संपत्ती कमावलेली आहे, ती वाम मार्गाने कमावली असल्यामुळे (सन्माननीय अपवाद वगळता)त्यांना ईडी, सीडी बिडीची भीती वाटते आणि म्हणून ते ईव्हीएमच्या विरोधात आवाज बुलंद करत नाहीत. त्यांना काही पडलेले नाही, कारण त्यांच्या सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांच्याकडे पडलेली आहे आणि म्हणून सामान्यांनाच आता ही लढाई आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल. कारण लोकशाही जिवंत राहील की नाही? हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे. आज राजरोसपणे सरकारी उद्योग विकले जात आहेत. राजरोस पणे शेतकऱ्यांच्या विरोधात बिल पास होत आहेत. राजरोसपणे जीएसटी आणून इथला सामान्य व्यापारी देशोधडीला लावला जातोय, एका क्षणाचा ही विलंब न लावता नोटबंदी होत आहे. यामध्ये शेकडो गरीब मारले जात आहेत.कष्टकरी रस्त्यावर आणला जात आहे. असं असताना काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष एकमेकाला पूरक अशा प्रकारचे काम करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे यांनी ते ईव्हीएमच्या विरोधात राज्यकर्त्यांकडून आवाज उठवणे शक्य नाही आणि तशी कोणी अपेक्षाही धरू नये. ते तुमच्या आमच्या बालिशपणाचे ठरेल!आणि म्हणून आता जनतेनेच ही लढाई हातात घ्यावी असं कुठेतरी वाटायला लागलेल आहे.
तसे पाहिले तर केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची कुठलीही अशी अचीवमेंट दिसत नाही. कामगारांचे, मजुरांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे नोकरदारांचे, सामान्यांचे, गरिबांचे प्रश्न अव्याहतपणे तसेच दिसत आहेत, त्याची कदापिही सोडूवनूक होत नाही. जनतेचा प्रचंड आक्रोश सरकारच्या विरोधात असतानाही यांना बहुमत मिळतेच कसे? हा या प्रश्न आहे. त्यामुळे ईव्हीएम मॅन्युफ्लेशन करूनच हे जिंकत असावेत अस जनतेला वाटत आहे. तसे नसेल तर सरकारकडे अनेक वेळा अनेक पक्षाने बॅलेट पेपरची मागणी करूनही ईव्हीएम वरच इलेक्शन का घेतले जाते?
मोदींनी या देशावर शंभर वर्ष राज्य करावे त्याबद्दल आम्हाला काहीही दुःख नाही, परंतु त्यांनी जनतेचा बॅलेट पेपर वरती कौल घेऊन, या देशावरती राज्य करावं. (असे जनतेला वाटते कारण जनतेचा ईव्हीएम वरती अजिबात विश्वास नाही) अनेक देशांमध्ये ईव्हीएम ला बंदी असताना आपल्याच देशांमध्ये ईव्हीएम राजरोसपणे चालू आहे ते कशासाठी ? दुसरा भाग असा मतदान झाल्यानंतर अनेक दिवस ह्या ईव्हीएम कुठेतरी गोदामात ठेवल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर एक दिवस ठरवून त्यामधील ओटींगचे काउंटिंग केले जात आहे. त्यापेक्षा पूर्वी इलेक्शन झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशीपासून काउंटिंगला सुरुवात केली जायची भले तीन चार पाच दिवस लागले तरी चालेल परंतु जनतेचा खरा कौल बॅलेट पेपर मुळेच कळणार आहे ईव्हीएम मुळे नाही. किंवा काही गडबड असल्यास पुनर काउंटिंग करण्याची व्यवस्था बॅलेट पेपर मध्ये आहे परंतु ईव्हीएम मध्ये तसे होत नाही किंबहुना केले जात नाही.
बऱ्याच वेळेला ईव्हीएम चालू असते तर व्हीव्हीपॅट मशीन बंद असतात आणि अनेक गोंधळ अनेक प्रॉब्लेम असतानाही त्याच्यावर का भिस्त दिली जात आहे? या देशाला कोणी वाली आहे का नाही? या देशांमध्ये कोणी बोलणार आहे की नाही? अरे कधी बोलणार आहात? तुमच्या गळ्यावरती सुर्या आणि चाकू फिरल्यावर? जनतेला जर वाटत असेल की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्याचे असे मातेरे होऊ नये. जनतेला जर असं वाटत असेल की, हा देश फार कष्टाने स्वातंत्र झाला आहे. ते कष्ट ते बलिदान वाया जाऊ नये. जनतेला जर असं वाटत असेल की, या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, तर ईव्हीएमला विरोध करण्याची वेळ आता आलेली आहे. जनतेला जर वाटत असेल, या देशाचे संविधान आबादित राहिल पाहिजे, तर ईव्हीएम ला विरोध केलाच पाहिजे. जनतेला असं वाटत असेल की, आपल्या मुलाबळावर अन्याय होता कामा नये, तर ईव्हीएम मधून निघणाऱ्या आयत्या बिळावरच्या नागोबांना चाप बसला पाहिजे. जनतेला असं वाटत असेल की, आपल्याला या देशांमध्ये न्याय मिळाला पाहिजे तर खरे प्रतिनिधी संसदेत आणि विधानसभेत गेले पाहिजेत.
कालच माननीय प्रकाश आंबेडकर यांनी बॅलेट पेपरचा पुनरुचार केला आहे तसेच संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याने सुद्धा ईव्हीएम वरती जोरदार आक्षेप घेऊन ईव्हीएम ही नव्या युगाची मनुस्मृती अशी निर्भसना केली आहे.आपला देश कोणाच्या बापाची जागीर नाही.तो राज रोस पणे विकला जातोय!!काय चालले आहे? अरे उठा, जरा जागृत व्हा ! देशवासीनो जरा जागृत व्हा, अन्यथा आज दुसरा मरतोय उद्या तुम्ही मराल. तुमच्यावर उद्या वेळ येईल तेव्हा तुम्हालाही कोणी वाचवणार नाहीये! उठा आणि या लढ्याला सज्ज व्हा! अन्यथा आपण सगळं गमावून बसू आपण सगळं गमावून बसू. ईव्हीएम चा विरोध हा लोक लढा झाला पाहिजे. लोकलढ्या शिवाय पर्याय नाही येणाऱ्या 24 च्या इलेक्शनची वाट बघू नका. आत्ताच बॅलेट पेपरवर इलेक्शनचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडा. तरच येणारी पिढी आपल्याला माफ करेल अन्यथा नाही याचं भान असू द्या..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत
EVM मधून निघणाऱ्या आयत्या बिळाव रच्या नागो बांना चाप बसला पाहिजे..! खूप छान????????????
thank you sir