देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 2

१८६३ मध्ये सर अलेक्सझांडर कनिंघम यांनी मेजर मिड यांना बुद्धगया येथे उत्खनन करण्यास सांगितले. नंतर १८८० मध्ये, बंगालचे लेफ्ट.गव्हर्नर सर ऍशली इडन यांनी बेग्लर यांना महाबोधी महाविहाराचे संवर्धन करण्यास सांगितले. उत्खननामध्ये अनेक प्राचीन शिल्प, नाणी, स्तंभ, शिलालेख सापडले जे महाबोधी महाविहाराच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकले.

सिंहली भिक्खू बोधिरक्षित यांच्या शिलालेखांवरून कळते कि या महाविहाराला सर्वात प्राचीन भेट सिंहली भिक्खू चुल्ल तिस्स यांनी इ.स.पूर्व १०० मध्ये दिली होती.

वज्रासनाच्या पायथ्याशी सापडलेली सोन्याची व चांदीच्या नाण्यांवरून लक्षात येते कि इ.स.१४० मध्ये कनिष्काचा मुलगा राजा हुविष्का याने या महाविहाराचा जिर्णोद्धार केला. वज्रासनाच्या व भ.बुद्धांच्या मूर्तीच्या पायाशी इंडो स्किथियन शिलालेख याची खात्री देते.

इ.स. ३९९ – ४०९ दरम्यान फा हियान या चिनी बौद्ध भिक्खूने महाविहाराला दोनदा भेट दिल्याचा उल्लेख आहे. यात त्याने महाविहाराच्या परिसराचे तपशीलवार वर्णन केले आहे.

इ.स. ४थ्या शतकाच्या पूर्वार्धात, श्रीलंकेचा राजा मेघवन याचा भाऊ बुद्धगयेला आला असता, त्याला राहण्यासाठी ठिकाण सापडले नाही. आपल्या भावाला सांगितल्यावर, मेघवन ने बुद्धगया येथे मुख्य महाविहाराच्या पूर्वेला एक महाबोधी विहार बांधले जेथे सर्वांना प्रवेश होता. या विहाराच्या दारावर एक पितळी धातूपट्टी होती ज्यावर लिहिले होते, “प्रत्येकाला, कोणत्याही अटींशिवाय मदत करणे हे बुद्धांचे सर्वश्रेष्ठ विचार होय”. कालांतराने हे विहार एक महत्त्वाचे बौद्ध विद्यापीठ झाले ज्याचा शैक्षणिक स्तर नालंदा किंवा विक्रमशिला सारखा होता. हुयान त्सांग ने याचे वर्णन करताना म्हटले आहे कि यात सहा मोठी विहारे, तीन मजली टेहळणी बुरुज व संपूर्ण विहाराला सुरक्षेसाठी चाळीस फूट उंच भिंत होती. आतमध्ये भ.बुद्धांची सोनं व चांदीची मूर्ती होती व ती रत्नजडित होती. त्याकाळी तेथे जवळपास १००० भिक्खूंचे वास्तव्य होते. याच विहारात जगप्रसिद्ध बौद्ध आचार्य बुद्धघोष यांनी श्रीलंकेला जाण्यापूर्वी “अठ्ठसालिनि” व “ज्ञानोदय” (जो आता नष्ट झालाय) लिहिला. चिं हुन, हुआन चाऊ, धर्मपाला (माध्यमकाचतुःसटिका चे लेखक) आणि रत्नवज्रा हे काही प्रसिद्ध भिक्खू याच विहारात होऊन गेले. येथे उत्खनन करताना, कनिंघम यांना या विहाराचा परिसर २००० फूट लांब व १००० फूट रुंद दिसला व त्याची भिंत ९ फूट जाड होती. हे महाबोधी विहार १३व्या शतकापर्यंत सुरु होते, नंतर ते लयाला गेले. आजही त्याचे उरले सुरले अवशेष पाहायला मिळतात.

लेखक – अतुल भोसेकर, नाशिक


BUDDHA GAYA – The place of The Buddha’s Enlightenment…..part 2

In 1863, Sir Alexander Cunningham asked Major Meade to carry out excavation at Buddha Gaya. Later on in 1880, Sir Ashley Eden, the Lt. Governor of Bengal appointed Mr. J. D. Beglar to carry out thorough repairs of the whole vihara. During excavation, a number of antiquities were found which signify the various repairs carried out in the Mahabodhi Mahavira.

The earliest known foreign visitor as per inscription of Bodhirakshita is a Sinhalese monk named Culla Tissa, who visited the Mahavihara in 100 BCE.

At the Vajrasana, gold coins and some silver punched coins of the Indo Scythian King Huvishka (King Kanishka’s son) belonging to 140 CE were found. The inscription on the outer side of Vajrasan confirms it. This shows that the present structure was added by King Huvishka. The Vajrasana as well as the Buddha image bears Indo-Scythian inscription.

Fai Hian twice visited the Mahabodhi Mahavira between 399 – 409 CE and has given a detailed description of the Vihara. He was the first Chinese monk to reach the land of the Buddha.

In the first half of 4th century CE, Srilankan King Meghavan’s brother visited Buddhagaya and finding no proper place to stay asked the King to built one. On getting permission from local ruler, King Maghavana built a huge Mahabodhi Monastery on the North side of the Vihara. On its door was placed a copper plaque stating, “To help all without distinction is the highest teaching of all the Buddhas”. This monastery went on to become one of the finest monastic universities nearly at par with Nalanda or Vikramshila. Hsuen Tsang has described this monastery has having six large viharas, three storied watch towers surrounded by a wall of 30-40 feet tall. Inside was an image of the Buddha in gold and silver with precious stones. The stupas built were high and contained relics of the Buddha. He records nearly 1000 monks residing there. The great Acharya Buddhagosha wrote the famous commentary Attasalini and Dnanoday (now lost) at this monastery before leaving for Srilanka. Some renowned monks associated with this monastery were Chin-hung, Hsuan-chao, Dharmapala (author of Madhyamakacatuhsatika) and Ratnavajra. In the 19th century, Cunningham after excavation mentioned that the Mahabodhi monastery was 2000 ft in length and 1000 ft in width. The walls were 9 ft thick with massive round towers on all the four sides. This monastery existed till the end of 13th century CE.

Atul Bhosekar

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!