
विजयपत सिंघानिया काय म्हणाले?
“मला रस्त्यावर आणून गौतम सिंघानियाला आनंद झाला. २०१५ मध्ये मी रेमंडची जबाबदारी त्याला दिली. मात्र मी सगळं काही त्याच्या नावे करायला नको होतं. तो माझा मूर्खपणाचा निर्णय होता. मला रस्त्यावर आणून त्याला (गौतम सिंघानिया) आनंद झाला.” असं विजयपत सिंघानिया म्हणाले. बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत विजयपत सिंघानिया यांनी हे भाष्य केलं आहे.माझ्या मुलाला मी सगळं काही देणं ही माझी चूक होती असंही विजयपत सिंघानिया म्हणाले आहेत.
रेमंड ग्रुपचे प्रमुख गौतम सिंघानिया हे त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानियांना दिलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवाज मोदी यांनी गौतम सिंघानिया मारहाण करत असल्याचंही वक्तव्य केलं होतं. या वादात आता गौतम सिंघानियांचे वडील आणि रेमंडचे माजी प्रमुख विजयपत सिंघानिया यांची एंट्री झाली आहे. त्यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मला रस्त्यावर आणून त्याला खूप आनंद झाला आहे असंही विजयपत सिंघानिया म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत