मराठी पाट्या नाही! 161 दुकानांवर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाकडून २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली होती. आता ती मुदत संपल्यानंतर दुकानांवर मराठी नामफलक लावण्यावरून मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. ज्यांनी अजूनही मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांनी लवकरात लवकर मराठी फलक लावावेत अन्यथा कारवाईचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने ३ हजार २६९ दुकाने आणि आस्थापनांची पाहणी करून १७६ दुकानांवर कारवाई केली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी १६१ दुकानांवर कारवाई केली.
मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने दुकानदारांना
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, मुंबई महापालिका क्षेत्रात २८ नोव्हेंबरपासून आता दुकाने आणि आस्थापनांवर मराठी भाषेत व देवनागरी लिपीत नामफलक लावणे बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्देशांची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
बुधवारी मुंबई महापालिकेच्या पथकाने ३ हजार ५७५ दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान, पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या १६१ दुकानांवर कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत प्रशासनाच्या पथकांनी ३३७ दुकानांवर कारवाई केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत