मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर सेवा भावी संस्थांची मदत घेतली जाणार : – डॉ गोऱ्हे

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर छोट्या मोठ्या संस्थांना घेऊन काम केल्यास आपणाता मदतच होईल आसे प्रतिपादन
विधान परिषदेच्या उपाध्यक्षा मा.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी एनजीओ व प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक घेतली त्या वेळेस त्या बोलत होत्या .
छ.संभाजीनगर येथे दिनांक २४ फेब्रुवारी रोजी छ. संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात त सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती मा.डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब
यांच्या उपस्थितीत व दुष्काळ निवारण मंचचे स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी ,पत्रकार यांचे उपस्थितीत. मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरती आढावा बैठक संपन्न झाली .यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्री रमेश भिसे यांनी मराठवाड्यातील दुष्काळाच्या संदर्भात एनजीओ ना जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर शासनाने उपाय योजना करण्याच्या साठी सोबत घेवून काम केल्यास दुष्काळ निवारण करण्यासाठी जनतेला मदतच होईल याची माहिती दिली व दुष्काळासंदर्भातील १८ मागण्या. वाचून दाखवल्या व सदर चे निवेदन सर्व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मा.डॉ.नीलमताई गोऱ्हे तसेच जिल्हाधिकारी श्री स्वामी साहेब यांना सुपूर्त केले .
यावेळी जिल्हाधिकारी स्वामी साहेबांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात दुष्काळाच्या संदर्भात रोजगार. पाणी या विषयी कामाचा आढावा मांडला तसेच ग्रामीण भागात पिण्यासाठी फक्त दहा ते बारा टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली .
यावेळी मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी तसेच रोजगार व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनणार असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे शासन ,प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात लोकांसाठी दुष्काळाच्या निवारणार्थ काम करण्याची गरज असल्याचे सर्वानुमते ठरले. नंतर पत्रकार परिषद होऊन दुष्काळा संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची ,कामाची मांडणी मा. डॉ .नीलमताई गोऱ्हे यांनी केली.
सदर बैठकीसाठी मराठवाड्यातील दुष्काळ निवारण मंच (एमडीआरएसपी) स्वयंसेवी संस्थांचे श्री रमेश भिसे ,पुष्कराज तायडे एच.पी. देशमुख धनाजी धोतरकर, रमेश कुटे, मारुती बनसोडे ,विजय भिसे हे उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत