मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बौद्धांच्या न्याय हक्क आणि मानवतेचे रक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची गरज – राजश्रीताई कदम

तुळजापूर तालुक्यातील केशेगावात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे निडर योद्धा असावा समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी कटीबद्ध असावा समाजातील नागरिकावर अन्याय अत्याचार आवहेलना गुलामगिरी अत्यंत निष्ठेने नष्ट करणारा असावा , कुठे अन्याय होत असेल तर शौर्याने लढा उभारण्या साठी प्रामाणिक प्रयत्न करणारा आसावा समाजातल्या प्रत्येक विद्यार्थी आसेल वृद्ध आसेल त्याना योग्य न्याय देत सामाजाल जागृत करण्यासाठी समता सैनिक दलाची खुप मोठी जबाबदारी आहे ती प्रमाणिक पणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणे आजच्या काळाची गरज आहे . बौद्ध व अनुसूचित जातीतील नागरिकांचे न्याय हक्क समता समानता आणि अखंडता राखण्यासाठी त्याच बरोबर समाजात शिस्त लावण्यासाठी व मानवतेचे रक्षण करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दि १३ मार्च १९२७ ला समता सैनिक दलाची स्थापना केली , गावा गावात समता सैनिक दलाची शाखा सुरू करणे खुप आजच्या काळाची गरज आहे आसे परखड मत भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्याच्या कोषाध्यक्षा राजश्रीताई कदम यांनी केले .
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया [ अर्थात ]भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर मौजे केशेगाव ता तुळजापूर येथे संपन्न झाले यावेळी त्या प्रास्ताविक करतना बोलत होत्या
या शिबीरास प्रशिक्षण मेजर अनिल कांबळे यांनी दिले
या प्रशिक्षणात २१ महिला ४ पुरुषानी सहभाग नोंदविला . होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रिय शिक्षक तथा बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे , संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे , संस्था विभागाचे सचिव कुमार ढेपे , तालुका सरचिटणीस विठ्ठल सुरते हे होते तर यावेळी उपाध्यक्ष वैभव शिरसाठ , तालुका समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष उमेश पांडागळे , अंनता कांबळे , तानाजी नागटिळक , शिवराज शरद बागडे, गौतम कांबळे, कपिल कांबळे आधी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सुरते यांनी केले शेवटी आभार गौतम कांबळे यांनी मानले .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!