आंबेडकरी अभ्यासक प्रमोद मुन यांनी केले वक्तव्य “संविधान आहे काळाची गरज”

26 नोव्हेंबर (रवीवार) ला भारतीय संविधानाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्या बुटीबोरी येथील हॉटेल रॉयल रिजन्सी च्या इमारतीत पीपल्स पँथर च्या कार्यालचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक आंबेडकरी अभ्यासक प्रमोद मुन आदी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानामुळे देशातील समग्र जनतेला हक्क व अधिकार मिळाले. त्यांचमुळे आज सर्वसामान्य माणूस आपल्या न्याय हक्काची लढाई लढतो आहे. संविधानामुळे भारतातील लोकशाही अबाधित आहे. म्हणून संविधानाचे संरक्षण व संवर्धन करणे या देशातील युवकांची गरज आहे. यासाठी अत्यंत सजग राहणे गरजेचे आहे. परंतु सध्यास्थितीत देशातील लोकशाहीच धोक्यात आली म्हणून संविधान टिकविणे काळाची गरज आहे. त्याकरिता जास्तीत जास्त तरुणांनी पीपल्स पँथर शी जुळून संविधान वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, कारण संविधान टिकेल तर देश टिकेल असे प्रतिपादन आंबेडकरी अभ्यासक प्रमोद मुन यांनी केले.
यावेळी सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर पीपल्स पँथर चा उद्देश, भूमिका व लक्ष यावर चर्चा करण्यात आली. देशात सुरु असलेल्या जठील समस्या सनातन धर्म व हिंदू राष्ट्र, खाजगीकरण, कंत्राटी भरती व सामाजिक समतेकरिता सांस्कृतिक लढा याविरोधात शासनाविरोधात रस्त्यावर येण्याकरिता पीपल्स पँथरचे संघटन बांधणी करण्याच्या सूचना भूपेश थुलकर यांनी दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत