नाशिक : लेकाच्या जीवाचा सौदा केला बापाने

कळवणचे पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर उर्फ टिल्लू दगू उशीर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर दगू जयराम उशीर आणि संदीप छगन गायकवाड असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपी दगू उशीर यानेच सुपारी देऊन मुलाची हत्या घडवून आणली आहे. सतत दारू पिऊन पैशांची मागणी करतो, शिवीगाळ आणि धमकी देतो म्हणून बापानेच मुलाची सुपारी दिली.
नाशिकच्या लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरण परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपींना गजाआड केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ३० वर्षीय आरोपीसह मृताच्या वडिलांना अटक केली. तर अन्य एका अल्पवयीन तरुणाला बालसुधारगृहात पाठवलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत