महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंत रविदास महाराजसामाजिक / सांस्कृतिक

संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज लेख शृंखला – 4

गुरू रविदासांची श्रमसाधना…

गुरू रविदास महाराजा विषयी अनेक लोककथा ,चमत्कार हिंदी साहित्यात आढळतात.तत्कलीन संत महात्म्यांनी रविदासांची अनेकदा सत्व परिक्षा घेतल्या होत्या.जन मान्यता राज मान्यता प्राप्त होण्याच्या त्या जणू पायर्‍यांच होत्या.त्या पैकी पारस मण्याची गोष्ट प्रसिद्ध आहे.त्या गोष्टीतून आपणास हा बोध होतो की ,रविदास महाराज अतिशय वास्तववादी होते. ठेविले अनंते तैसेची रहावे या विचाराचे ते नव्हते. त्यांचा जसा अंधश्रद्धा कर्मकांड कु रिती ना विरोध होता,तसा आळशीपणा,ऐतखाऊपणा, नाकर्तेपणाला विरोध होता.संन्यासी होऊन अंगाला भस्म फासून भिक्षा मागून किंव्हा दक्षिणा मागून उदर निर्वाह करणारे ते साधू नव्हते. ते आपला पारंपारिक चांभारी धंदा प्रामाणिक पणे करून स्वकमाईतून घरसंसार उत्तमरीत्या चालवायचे.त्याच कमाईतून काशीला जाणाऱ्या भुकेल्या साधूसंत,पांथस्थांना , गरिबांना यथेच्छ भोजन पाणी देऊन, त्यांची मनोभावे सेवा करीतअसत.सर्व जात धर्म पंथातील थकले भागले साधू,मुनी फकीर,अबाल वृद्ध हया सेवेचा लाभ घेत.
एकदा एका सिद्ध योगी साधू पुरूषाने ही सेवा पाहिली .
रविदासाच्या झोपडीत तर दारिद्र्य दिसते आहे तरी ही त्यांची सेवा चालूच असते .हे पाहून त्यांनी त्यांच्या
जवळील पारसमणी रविदासाना दिला व म्हणाले कि तुमची ही सेवा पाहून मी धन्य झालो आहे. या पारस मण्याने तुम्ही लोखंडाचे सोने करून तूमचा खर्च भागवा.आम्ही संन्यासी आहोत, भ्रमंती करत भिक्षुकीवर पोट भरतो. हया मण्याची आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त गरज आहे.तुम्हाला पाहिजे तेंव्हा हवं तेवढे धन मिळवू शकता…! यावर रविदास विनम्रपणे म्हणाले …
मेरे धन राम कछु पाकर म सरै काम !
दाम मै चाहौ डारो तन वारिको!!
साधु महाराज , आपल्या सदभावनेबद्धल मी आपला आभारी आहे. पण माझे धन तर राम आहे. तो राम माझ्या ह्रदयात आहे.. त रामधन मला काही कमी पडू देत नाही.
पारस मनी मुहि रतु नहि भावै,जग जंजार न थोरा!
कहि रविदास नजि सभ त्रिस्ना,
इकू राम चरन चित्त मोरा !!

ह्या पारसमण्याची मला रत्तीभर पण जरूरी नाही .धन संपत्तीचा जंजाळ मला नको आहे. माझ्या मनाच्या सारया तृष्णा सुटल्या आहेत.माझ्या चित्त्तात कसले ही फुकटचे काही ही स्वीकारायचे नाही हा रामभाव रहात आहे.
रविदास हमारो रामजी दसरथ करि सुत नाही!
राम हमऊ मंहि रमि रह्यो,बिसब कुटंबहमांहि !
आणि हो ऐका ..माझा राम दशरथ पुत्र राम नाही हा…! तो राम जो तुमच्या माझ्या ह्रदयात सर्वव्यापी आहे.जो विश्व रूपी कुटुंबात सामावलेला आहे.तो माझा राम आहे.मी त्या रामाची आराधना करतो,माझी आराधना व्रत वैकल्ये नसून मेहनत मजुरी म्हणजे कष्ट आहे.ती माझी श्रमसाधना आहे…
ॲडम स्मिथ जे अर्थ शास्त्राचे जनकआहेत ते लिहतात की, मानव नैसर्गिक पणे जगण्याची कला शिकतो.
जगण्याच्या कलेचे हे” प्रमेय ” रविदासानी कित्येक शतकापूर्वी मांडले आहे.माझी कला माझा धंदा आहे. मी तो मुखाने रामनाम व हाताने काम करीत करतो . कुटुंबाच्या प्रेमा पोटी जबाबदारीने करतो. कामाला पुजा समजून मी नेक व्यवहार म्हणजे सुकर्म (customer service/ customer care + गुणवत्ता quality+पारंगतपणे skills) गाहकास देव ( customer is god ) असे मानून ग्राहक सेवा करतो .ती माझी श्रम साधना आहे. या अर्थाने मी देवाची सेवा करतो. सेवा हाच माझा राम आहे. ती माझी श्रमसाधना आहे. उपासनाआहे.ह्या उपासनेत माझे सत्कर्म आणि धर्म आहे. या अर्थशास्त्रायीय प्रमेयातून ते जगाला संदेश देतात की, धरम करम दुई एक है ..! ज्या धर्मात जात ही जन्माधारीत मानली जाते ती जात इथे कर्माने खलास करतात. ही त्यांची आत्मप्रचिती आहे. कर्म आणि धर्माचा अर्थ सागणारे शास्त्र म्हणजे अर्थ शास्त्र याचा ते सहज उलगडा करतात.

मै रुखी सुखी खाऊं,औरनकी भुख मिटाऊं!
कोई परै ना दुख की पासा ,सब सुखी बसै रविदास!!
मी स्वकष्टाची मेहनतीची रुकीसुकी (मीठ भाकर ) समाधानाने खातो पण दुसर्‍याची भुक मिटवून त्याला जे सुख मिळते त्यात मी माझे समाधान पहातो. त्या समाधानाने तारणहार रामरूपी (ग्राहक) मला भेटायला घरी येतो.मला काही कमी पडत नाही.
श्रमसाधना ही सुख समाधानाचे सऱळ साधे आणि सोपे साधन आहे….!
जय रविदास
लेखक.ॲड.आनंद गवळी.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!