
१५ जानेवारीपर्यंत प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेतल्या जातील असे समितीने पत्रकात म्हटले. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय चौकटीत योग्य ते बदल करण्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. याबाबत समितीने कायदा आयोगाचे मतही विचारात घेतले आहे तसच ६ राष्ट्रीय पक्ष,३३ राज्य पक्ष आणि ७ नोंदणीकृत पक्षांना त्याचे मत आणि संवाद साधण्यासाठी पत्रे पाठवण्यात आली असल्याचं सांगितले आहे.गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समिती स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत