चंद्रपुरात पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड.

अवकाळी पाऊस, गारपीट यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. पीक विमा काढूनही विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. यासाठी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन केलं. महसूल अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. अधिकाऱ्यांना तातडीनं मदत देण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. त्यानंतर कार्यवाही न झाल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी विमा कंपनीचं कार्यालय गाठत तेथे तोडफोड केली.
विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केल्यानंतरही प्रशासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार नसले तर आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, त्याला प्रशासन व विमा कंपन्यांचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही चंद्रपूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलाय. त्यामुळं आगामी काळात पीकविम्याच्या मुद्द्यावर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत