मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
मतदार मत का विकतो?

आपण लोकशाही स्वीकारली आहे.लोकशाही म्हणजे लोकांच्या हितासाठी लोकांच्या मतांनी बनवलेली लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषदा.यासाठी निवडणुक प्रणाली आहे.त्यात महत्वाचा घटक आहे मतदार.मतदार हाच लोकशाही चा खरा पाया आहे.पण येथे तोच कच्चा आहे.कसा?त्या मतदाराला मताचे महत्त्व माहीत नसल्याने तो मत विकून टाकतो.जसे गाढव उकिरड्यावर चरत असतांना जर तेथे सोने चांदी ची वस्तू,दागिना दिसला तर तो जोरात फुंकर मारून दूर करतो.त्याला माहिती नाही कि,हे सोने चांदी किती महत्त्वाचे आहे.तसे मुर्ख माणसाला माहिती नाही कि,हे मत किती महत्त्वाचे आहे.म्हणून तो गाढव सारखा पांचशे रूपयात फुकतो.ते घेऊन बदमाष माणूस आमदार खासदार नगरसेवक बनतो.यावरूनच म्हणीचा प्रघात पडला आहे कि,गाढवाला गुळाची चव नाही.तशी मुर्खाला मताची चव नाही.म्हणून लोकशाही चा घात होऊ शकतो.होत आहे.
लोकशाही बिघडण्याचे दुसरे कारण आहे,चोरांना नेता समजणे.गांवात असो कि शहरात जो माणूस चोरी करतो, अपहार करतो, भ्रष्टाचार करतो तो माणूस लोकांना खाऊ पिऊ घालतो.मुर्ख माणसे त्याला नेता समजू लागतात.गावातील शेतकरी कामकरी आणि शहरातील झोपडपट्टीतील लोक मंडपातील जेवणाला पर्वणी समजतात.देणाऱ्याला नेता समजतात.हे तर चंबळ च्या डाकूंसारखेच आहे.शोलेतील गब्बर सिंग सारखेच आहे.जो जास्त चोरी करून आणतो,जो जास्त मुडदे पाडतो त्याला नेता समजणे.हे भयंकर चुकीचे आहे.
मी जळगाव शहरातील रहिवासी आहे.तर एखाद्या दारूविक्रेता, सट्टावाला, रेतीमाफिया, डान्सबार वाला जर मंडपात जेवण देत असेल तर मुर्ख लोक गर्दी करतांना पाहातो.ही माणसे विचार करीतच नाहीत कि,या चोराने कोठून ही संपत्ती जमा केली आहे.तितकी बुद्धी त्यांचेकडे नसावी.स्वताच्या वाहनाने, स्वताच्या खर्चाने सभेला जाणारी माणसे गावात कमी आढळतात.म्हणून गावांसाठी भरमसाठ निधी देऊनही गांवे सुधारली नाहीत.तसेच झोपडपट्टी भागात फुकटचे राशन,फुकटचे घरकुल,फुकटचा संडास, फुकटची शाळा, शाळेतील फुकट जेवण देऊनही सुधारले नाहीत.उलट फुकटचे वाट पाहाण्याची सवय जडली.अशी माणसे नेहमीच भुभूक्षू असतात.त्यांना दिलेले संविधानात्मक आधिकार सहज फुकतात .जसे गाढव उकिरडा फुंकते.हे लोक लोकशाहीला मारक आहेत.म्हणूनच गुंड गुन्हेगार,लिकर कींग,सटोडिया, रेतीमाफिया, डान्सबार वाले नगरसेवक, आमदार खासदार निवडून येतात.यात जळगाव शहराने अंतिम सीमा गाठलेली आहे.
या मत विकणारे लोकांना जागृत करणे,सचेत करणे चालू आहे.बुद्धी कमी असल्याने,ज्ञान कमी असल्याने, नितीमत्ता नसल्याने ते कठीण काम आहे.
पण, शहरातील जे बुद्धिमान,ज्ञानी, नितीमान लोक आहेत त्यांचे पर्यंत आम्ही सहज पोहचतो.आमचे म्हणणे त्यांना लवकर कळते.ते विचार तर करतातच शिवाय इतरांना प्रवृत्त करतात.याच लोकांना आम्ही जबाबदार मतदार समजतो.जो मत विकत नाही.पैसे घेतले तरीही चोराला मत देत नाहीत.हाच प्रबुद्ध मतदार लोकशाहीला सावरू शकतो.लोकशाही पेलू शकतो.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत