व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं जरांगे-पाटलांना शोभत नाही, आरक्षणावरील लक्ष्य विचलित होतय- सुषमा अंधारें

दि. 23/11/2023
गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या, सुषमा अंधारे यांनी जरांगे-पाटलांना खडसावलं आहे. “जरांगे-पाटलांची भूमिका पाहून त्यांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याचं दिसत आहे.
व्यक्तिगत टीका-टिप्पणी करणं त्यांना शोभत नाही,” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी जरांगे-पाटलांना सुनावलं आहे. “केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा”, अशी मागणीही सुषमा अंधारेंनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत