आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानभवनात सुनावणी सुरू

आज सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानभवनात सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची फेरतपासणी घेतली जात आहे. विधीमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पक्षप्रमुखांनी सूचना केली होती, त्यामुळं पक्षाचा प्रतोद म्हणून व्हीप बजावला होता, असं सुनील प्रभू यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी लिखित कागदपत्रांच्या पुराव्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या सत्रातदेखील ही सुनावणी सुरू राहणार आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ३१ डिसेंबरपूर्वी या याचिकांवर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याआधीचं दिले आहेत. उद्धव ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल दाखल केलेल्या याचिकांवर निर्णय घेण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र शब्दांमधे नाराजी व्यक्त केली होती. आता ही सुनावणी रोज सुरू ठेवण्याचा निर्णय नार्वेकरांनी घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत