मुंबई येथे संविधान दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वतीने होणाऱ्या भव्य रॅली व सभेच्या नियोजनाची जिल्हा बैठक संपन्न.

धाराशिव: दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे येत्या शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य संविधान रॅली व सभेच्या नियोजना संदर्भातील धाराशिव जिल्हा वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष आयु. अशोक हिंगे पाटील यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. तर मराठवाडा महासचिव तथा धाराशिव जिल्हा प्रभारी एडवोकेट रमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुंबई येथे आयोजित केलेल्या संविधान रॅली व सभेच्या नियोजना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी डी शिंदे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, जिल्हा कोषाध्यक्ष विद्यानंद वाघमारे, युवक आघाडीचे जिल्हा महासचिव धीरज शिंदे, तसेच जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व तालुक्याचे पदाधिकारी, जिल्हा युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक हिंगे पाटील व रमेश गायकवाड यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले व मुंबईला सभेच्या ठिकाणी जिल्ह्यातून हजारो संख्येने कार्यकर्ते घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विद्यानंद वाघमारे यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार आयु. बाळासाहेब कदम यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत