मुंबईत दररोज ५०० किमी रस्ते धुतले जाणार

आज, सोमवारपासून मुंबईतील दररोज ५०० किमी रस्ते पाणी फवारणी करून धूळमुक्तीचा पर्याय अंगिकारला जाणार आहे. मात्र, डिसेंबरपासून सध्याच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १,००० किमी रस्ते धुण्याचे उद्दिष्ट पालिकेने बाळगले आहे.
मात्र, या उद्दिष्टासमोर आव्हानांची मालिका असल्याने त्यात कितपत यश येईल, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या पालिकेकडून दिवसाकाठी २६० किमीचे रस्ते धुण्यासाठी पाणी फवारणी केली जात असून त्यासाठी सुमारे ५० टँकरचा वापर केला जातो. या परिस्थितीत वाढीव उद्दिष्टांमुळे पाण्याच्या टँकरची संख्या वाढवणे, रस्ते धुण्यासाठी मनुष्यबळाची गरज आदी आव्हाने उभी ठाकली आहेत. मुंबईतील २४ विभागीय कार्यालयांतील विविध रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी, हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी, धुळीचे अत्यधिक प्रमाण असलेल्या वाहनांतील संयंत्राद्वारे पाण्याची फवारणी सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत