पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तब्बल पाच पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू .

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन तब्बल पाच पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालायत दाखल करण्यात आलंय. सर्व पोलिस कर्मचारी निवडणूक ड्यूटीसाठी जात असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिस जवान असलेली गाडी ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. सगळे जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जात होते. मागच्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. कितीही प्रयत्न केले तरी अपघात थांबत नाहीत. आजच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत