मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आला आढळून.

कल्याण ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रुळालगत असलेल्या अशोक सिंगल उद्यानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रेल्वे ट्रॅक परिसरात रेल्वे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना रुळा लगत असलेल्या झुडपात काहीतरी जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी झुडपात जाऊन पाहिले असता एक मृतदेह अर्धवट जळालेला अवस्थेत आढळून आला. याबाबत रेल्वे पोलिसांनी टिळक नगर पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला. सुरवातीला मृतदेह पालिकेच्या रुक्मिणी बाई रुग्णालय येथे पाठविण्यात आला. त्यानंतर सदर मृतदेह मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती टिळकनगर पोलिसांनी दिली.
35 ते 40 वर्षाच्या व्यक्तीचा हा मृतदेह असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीला जाळून त्याची हत्या करण्यात आल्याच्या संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत