समतावादी विषमतेच्या विळख्यात

या देशावर अनेकांनी आक्रमक करून राज्य सत्ता हस्तगत केली.आपली संस्कृती लादण्याचे काम आर्य चाणक्याने केले.मूळ संस्कृतीला बगल देऊन आपलीं संस्कृती लादली व आपले गुलाम केले.गुलामीची मानसिकता तयार केल्यामुळे आपले अस्तित्व विसरून आपल्या रितीरिवाज पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा विसरून यांच्यात विलीन झाले.याची संस्कृती आपली संस्कृती मानण्यात धन्यता मानू लागले. ही संस्कृती नसानसात भिनली. त्यामुळे हे बिनधास्त पुणे वावरू लागले.
ह्याला धक्का देण्याचे काम तथागत गौतम बुद्धांनी केले.समता बंधुत्व मैत्री करूणा ह्या जीवनमूल्ये रूजवून माणूस असल्याचे जाणिव करुन दिली.
सम्राट अशोक राज्यांनी बुध्द धम्माच्या प्रचार व प्रसार करून नवसकृतिचा परिचय करून दिला.
आपली ब्राम्हणी संस्कृति धोक्यात येत आहे म्हणून अशोक राज्याचा परंतु बृहद्रथ यांचा सेनापती पुष्यमित्र शृंग यांना आपल्याबाजूला करुन बृहदरथाचा खून करुन राज्य बळकाविले. व फर्मान सोडले की जो कोणी बुद्ध भिक्खू चे शिर कापून आणेल त्याला शंभर सुवर्ण मुद्रा दिल्या जातील.अशोक राज्यांनी बांधलेले स्तुप नष्ट करण्यात आले. भिक्खू च्या कत्तली करण्यात आल्या त्यामुळे बुद्ध धम्म लोप पावला.व प्रतिक्रांतीला सुरुवात झाली. पुष्य मित्र शुंग यांच्या रूपाने वैदिक संस्कृतिला चालना मिळाली.
विषम व्यवस्थे विरूद्ध महात्मा ज्योतीराव फुले यांनी विद्रोह पुकारून येथिल लोकांना जागृत करण्यासाठी शाळा सुरू केल्या . लोकांना सुशिक्षित करून जागृत केले.या कामी सावित्रीबाई फुले यांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले.
छत्री पती शाहू महाराज यांनी महात्मा फुले यांनी सुरू केलेली चळवळ विकसित करुन आपल्या राज्यात ५०\ टक्के नौकरी बहुजन समाजाला आरक्षित करुन त्यांच्या एकाधिकारशाहीला धक्का दिला.
सयाजीराव गायकवाड बडोद्याचे राजे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन अस्पृश्य समाजातील मुलांना प्रदेशात शिक्षणासाठी पाठविले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लोक लढा उभारून वैदिक संस्कृतिला आव्हान दिले.
वंचित लोकांना आपल्या अधिकारा प्रती जागृत करुन माणूस असल्याचे मनावर बिंबवले.
समतेची चळवळ मजबूत करण्यासाठी अनेक आंदोलनं उभी केली.
भारतीय राज्य घटना तयार करून नागरिक अधिकार मिळवून दिले.
सम्राट अशोकाच्या क्रांतीनंतर दुसरी क्रांती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली.
वैदिक संस्कृति चे लोक घाबरले.व त्यांनी मोर्चेबांधणी करुन व सत्तेच्या माध्यमातून समतावादी चळवळीत मतभेद निर्माण करण्यास सुरुवात केली.
देव व धर्म हिंदुंच्या नावांनी बहुजन समाजाला आपल्या नांदी लावून त्यांना धार्मिक कार्यात गुंतविले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देव देवतेच्या विरोधी असून हिंदु धर्म नष्ट करीत आहे म्हणून धर्माच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
ज्या बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी महात्मा ज्योतीराव फुले छत्रपती शाहू महाराज यांनी खस्ता खाल्ल्या अपमान सहन केला व प्रस्थापित व्यवस्था विरोधी जनजागृती करून बहुजन समाजात चेतना निर्माण केली.ती़ मशाल तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी बहुजन ओबीसी समाज ब्राम्हणी व्यवस्थेची कावड खांद्यावर घेण्यास आतुर झाला आहे.
ब्राम्हणी व्यवस्था फुले शाहू आंबेडकर यांनी उभी केली ति व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी चक्रव्यूह तयार करून त्यात ब्राह्मणेतर समाजाला सामील करीत आहेत. व त्यांच्या हातून समतेचे चक्र उलटे फिरविण्याचा भरघोष प्रयत्न करत आहेत.
फुले शाहू आंबेडकर यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर ब्राम्हणी मानसिकतेला व ससकृतिचा फास तोडल्या शिवाय पर्याय नाही.
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत