शिंदे गट ठाकरे गटाच्या राड्यानंतर चोख बंदोबस्त

गुरुवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा झाला. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सामोरा समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटाने जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे शिवतीर्थावर तानावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर जावून बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केल्यावर काही वेळाने हा प्रकार झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन त्यांनी केले आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी देखील ही घटना चुकीची असून शांतता राखण्याचे आवाहन केले केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत