मजुरांच्या सुटकेसाठी शक्तिशाली यंत्राच्या साहाय्याने बोगद्याच्या ढिगाऱ्यातून खोदकाम.

उत्तराखंडमध्ये चारधाम मार्गावर बांधकामाधीन बोगदा कोसळल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून अडकून पडलेल्या ४० मजुरांच्या सुटकेसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले. दिल्लीहून हवाई दलाच्या विमानाने वाहून आणलेल्या अतिशय शक्तिशाली (हेवी डय़ुटी) ड्रििलग यंत्राने बोगद्याच्या ढिगाऱ्यातून गुरुवारी खोदकाम सुरू केले.
अमेरिकेत निर्मित ‘ऑगर’ या यंत्राने काम सुरू करण्यापूर्वी सिल्क्यरा बोगद्याबाहेरील मजुरांनी पूजा केली. नव्या यंत्राद्वारे खोदकाम सुरू झाले, त्या वेळी बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के.सिंह घटनास्थळी पोहोचले.
एका लहान ऑगर यंत्राच्या साहाय्याने पोलादाच्या नलिका ढिगाऱ्यात घालण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर भारतीय हवाई दलाने हे उपकरण तुकडय़ा-तुकडय़ाने त्यांच्या सी-१३० हक्र्युलस वाहतूक विमानाने सुमारे तीस किलोमीटर अंतरावरील धावपट्टीपर्यंत नेले.
‘ताशी पाच ते दहा मीटर या वेगाने खोदून ते लवकरच अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला आशा आहे’ , असे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये पत्रकारांना सांगितले.
उत्तराखंडमध्ये सर्व बोगद्यांचा आढावा उत्तराखंडमध्ये बांधण्यात येत असलेल्या सर्व बोगद्यांचा आढावा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सांगितले. ‘केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बोगद्याच्या बांधकामानंतरही त्यावर देखरेख ठेवली जात होती. भविष्यात असे बोगदे बांधले जातील तेव्हा आम्ही त्यांचा आढावा घेऊ’, असे ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत