विजय वडेट्टीवारांना जीवे मारण्याची धमकी.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विरोध केल्याने ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वडेट्टीवार यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे मराठ्यांना थेट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या जरांगे- पाटील यांच्या भूमिकेला काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातून त्यांना धमकीचे संदेश येत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत