आज १४ नोव्हेंबर,वस्ताद लहूजी साळवे यांची जयंती!!

लहू राघोजी साळवे यांचा जन्म राघोजी व विठाबाई साळवे या मातंग कुटुंबात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी “पेठ” या गावी १४ नोव्हेंबर १७९४ रोजी झाला…!!
राघोजी साळवे हा मातंग प्रचंड ताकदवर होता तसा तो वस्तादही होता एकदा राघोजीने वाघाशी लढा दिला वाघाला ठार मारुन मृत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या दरबारात राघोजी गेला होता म्हणून राघोजीला पंचक्रोशीत सगळे टरकून होते…!!
राघोजीच्या पोटी जन्म घेतलेला लहू देखील बापासमान रगबाज आणि वस्ताद होता, लहूजी साळवे हे तलवार, दांडपट्टा चालविण्यात वाकबगार होते,म. फुले यांचे ते आखाड्यातील गुरु होते…!!
म.फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत लोकांनी मुली पाठविल्या पाहिजे म्हणून आणि सावित्रीमाई यांचे मनुवादी टारगटा पासुन रक्षणा साठी लहुजी साळवे यांनी ज्योतिबांना साथ दिली…!!
तिसऱ्या वर्गात निबंध लिहून मनुवाद्यांना प्रश्न विचारणारी मुक्ता साळवे ही लहूजी साळवे यांची पुतणी होती आणि सावित्रीमाईच्या पहिल्या बॅचची विद्यार्थ्यांनी होती…!!
वस्ताद लहूजी साळवे यांनी कट्टर मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटून फुले विचारधारेचा अंगिकार करीत फुले विचारधारेला बळ दिले अशा पराक्रमी पुरुषाची आज जयंती आहे…!!
लहूजी साळवे जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन, आणि कोटी कोटी वंदन…!!
जय भीम जय संविधान
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत